फोटोग्राफी : तुमचा कॅमेरा
Submitted by सावली on 20 August, 2010 - 11:57
त्या दिवशीच मी कॅमेर्याच्या शटरस्पिड बद्दल लिहायला घेतल. आणि मला जाणवल की जोपर्यंत कॅमेरा कसा चालतो त्याच्या आत मधे काय असते हे जाणुन घेत नाही तो पर्यंत पुढचे विषय लिहायला आणी समजायला दोन्ही कठीण आहेत. प्रकाशचित्रण हि एक अशी कला आहे जिचा पायाच भौतिकशास्त्र (Physics, तंत्रज्ञान(technology) आणि काहीसा जीवशास्त्रीयही(Biology) आहे. त्यामुळे थोड्याफार तांत्रिक गोष्टी येणारच. पण तरिही या गोष्टी थोड्या सोप्या करुन सांगता येतात का बघते. काही जणांसाठी हे कदाचित अगदिच बाळबोध होईल. पण ज्यांना अजिबात माहित नाही त्यांच्यासाठीतरी मला इथुनच सुरुवात करावी लागेल.
विषय:
शब्दखुणा: