हसवणूक फसवणूक
Submitted by अननस on 19 December, 2018 - 10:43
पु.ल. देशपांडेंच्या आठवणी तसेच इतर मराठी विनोदी लेखकांचे वाचनीय लेखन, त्यांच्या आठवणी या लेखन धाग्यावर आवश्य लिहा.
शब्दखुणा:
पु.ल. देशपांडेंच्या आठवणी तसेच इतर मराठी विनोदी लेखकांचे वाचनीय लेखन, त्यांच्या आठवणी या लेखन धाग्यावर आवश्य लिहा.
बिचारी माझी सहकर्मचारिणी !!!
(तिला आपण सहचा म्हणूया.)
काय झालं असं हा तुमचा प्रश्न असेल, मी कसं बरोबर ओळखलं !! जात्याच हुशार ना ! काय करणार. काही जण तर मला मनकवडी म्हणतात. असो . स्वस्तुती फार होतेय.
तर थोडक्यात प्रसंग असा घडला की , सहचाला लग्नाला जायचे होते. सीमांतपूजन गाठण्यासाठी ह्या बाईसाहेब हिंजवडी पट्टा ३ वरून नगर रोड ला (आणि तेही ऑफिस नंतर म्हणजे ट्रॅफिकची पीक (??) वेळ ) वाघोलीस्थित असणाऱ्या एका कार्यालयात (मंगल कार्यालय हो .. ऑफिस नाही काही .. ) जाणार होत्या.