शब्दांना तिने ओठात अडवल
उसनं हसु चेहऱ्यावर धाडल
सावज तिच होत चिलखती
पण तिने त्याला अनुल्लेखाने मारलं...
सावजानेही केली बरीच तडफड
वार चुकवण्याची निष्फळ धडपड
पण कुठेतरी त्याला वर्मी लागल
अन् तिने त्याला अनुल्लेखाने मारलं...
कशाची बंदुक आणि कसली कट्यार
तिच्याकड नव्हत कोणतही हत्यार
न पाहताही तिने सावजाला नेमक हेरल
अन तिने त्याला अनुल्लेखाने मारलं...
निखिल २३-१०-२०१८
एक कुटुंब अनेक वर्षे राहत असलेले घर सोडून नव्या जागी रहायला गेले. सानिका त्यांचे एकुतले एक अपत्य. ना धड लहान ना खूप मोठी त्यामुळे इतरांपेक्षा लवकर नव्या जागी रमली.
नव्याने तयार होणारी वसाहत त्यामुळे फार थोडे लोक रहायला आलेले. सानिकाच्या घरासमोर त्याचे घर. नाव मोहित. तिच्यापेक्षा वयाने चार वर्षे मोठा त्यामुळे साहजिकच दादा म्हणून ओळख झाली.
ओळख कोणत्याही नात्यात न अडकता हळूहळू मैत्रीत मुरत गेली. त्यांच्या गप्पांना ना कोणते विषय लागायचे ना कोणती वेळ. दंगामस्ती तर अशी रंगायची की पाहणाऱ्याला हेवा वाटायचा.