माझ्या श्वानप्रेमाची शोकांतिका?
Submitted by एम.जे. on 12 October, 2017 - 16:17
बालवयापासून थोडे मोठे व्हायला लागतो तसे आपले आजूबाजूच्या गोष्टींबद्दलचे कुतूहल वाढत असते. अशाच वयात आपली गट्टी जमते ती पक्षी-पाखरं आणि प्राण्यांशी. नकळत आपल्याला हा निसर्ग जवळचा वाटू लागतो. या निस्वार्थ सवंगड्यांबरोबर येणारी मजा औरच असते. माझ्या मनात लहानपणापासून या प्राणीविश्वाविषयी प्रेम निर्माण झाले. घरात एक कुत्रं पाळलेलं असल्यामुळे तर त्यात भरच पडली. त्याच्याशी रोज खेळण्यात मी दंग होई. ते गेल्यानंतर झालेलं दुःख माझ्या किशोरवयीन मनाला आभाळाएवढं वाटलं.
शब्दखुणा: