झिंपा
Submitted by अविनाश जोशी on 29 September, 2017 - 01:36
झिंपा
मी हे कॉम्पुटर समोर लिहीत आहे.
पण आता माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे मला माहित नाही.
पण तुम्हाला सुरवातीपासूनच सांगायला पाहिजे नाही का?
सकाळीच मी पुस्तक वाचत बसलो असताना, झिंपा धावत पळत आत आला.आल्या आल्या त्याने दार लावून घेतले. तो फारच घाबरलेला दिसत होता.
झिंपा म्हणजे झिंपा गोगोई. मूळचा आसामचा पण सध्या शिक्षणाकरिता पुण्यात राहिला आहे. त्याच्या बरोबर त्याची आत्याही असते. आई वडील दोघेही आसाम मध्ये चहाच्या मळ्यावर आहेत.
झिंपाच्या हकीकती व गोष्टी वेगळ्याच असतात. आसाममधले लोक जीवन आपल्यापेक्षा फार वेगळे आहे.
विषय: