झिंपा
मी हे कॉम्पुटर समोर लिहीत आहे.
पण आता माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे मला माहित नाही.
पण तुम्हाला सुरवातीपासूनच सांगायला पाहिजे नाही का?
सकाळीच मी पुस्तक वाचत बसलो असताना, झिंपा धावत पळत आत आला.आल्या आल्या त्याने दार लावून घेतले. तो फारच घाबरलेला दिसत होता.
झिंपा म्हणजे झिंपा गोगोई. मूळचा आसामचा पण सध्या शिक्षणाकरिता पुण्यात राहिला आहे. त्याच्या बरोबर त्याची आत्याही असते. आई वडील दोघेही आसाम मध्ये चहाच्या मळ्यावर आहेत.
झिंपाच्या हकीकती व गोष्टी वेगळ्याच असतात. आसाममधले लोक जीवन आपल्यापेक्षा फार वेगळे आहे.
त्याने सांगितलेल्या हकीकती प्रमाणे गेल्या आठवड्यात आसाममधील एका खेड्यातील एक माणूस त्यांच्या दारात आला. तो अर्धमेला झालेला होता आणि सारखे पांढरे भूत... पांढरे भूत... म्हणत होता. माझ्या वडिलांनी त्याला झोपायला जागा दिली, जेवायला घातले मग कुठे त्याला कंठ फुटला.
साहेब हे पांढरे भूत फार वाईट आहे. एकदा का ते तुमच्या मागे लागलं तर तुमचा जीव घेतल्याशिवाय थांबत नाही. ते भूत तुमचं रक्त पितं, कातडी सोलून काढतं आणि कित्येक वेळेला तुमचं हृदय सुद्धा बाहेर काढून खातं.
' अरे तू हे काय सांगतो आहेस? आणि तुझ्या मागे ते कसं लागलं?
' कॅमपोंग च्या मळ्यावर मॅनेजरची सुझी नावाची मुलगी होती. तिची आई अतिशय सुंदर पण मुलगी अगदीच कुरूप होती. लोकं तिला सतत नावं ठेवायचे. नेहमी तिची आईशी तुलना व्हायची. या सर्वाचा परिणाम म्हणून सुझीने आत्महत्या केली.
पण आता ती मेली ही नाही आणि जिवंत ही नाही आणि तिच्याबद्दल ज्यांना ज्यांना माहित होते त्या सर्वाना ती मारून टाकते. त्या लोकांना मारताना ती त्यांना पार कुरूप करून टाकते.
सुझीच लक्ष तुमच्याकडे जातं, तेव्हा ती तुम्हाला पहिल्यांदा हाक मारते आणि एकदा का तिची हाक तुम्ही ऐकलीत तर तुम्हाला मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही.
अर्थातच वडिलांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. चहाच्या मळ्यात अशा हकीकती नेहमीच प्रचिलित असतात.
' साहेब खरं म्हणजे हे मी तुम्हाला सांगायला नको होत. पण आता सांगितल्यामुळे तुम्हालाही सुझीबद्दल माहिती झाली आहे त्यामुळे तुमच्या जीवालाही धोका आहे.
रात्र बरीच झाली होती. दुसऱ्यादिवशी लवकर उठायचे होते.
दुसरा दिवस उजाडला तो चमत्कारिक रीत्याच. पहाटे किंचाळ्या ऐकू आल्या. वडील जाऊन पाहतात तर त्या पाहुण्यांचे अवयव पसरले होते. फारच वाईट रीतीने त्याचा अंत झाला होता. नाही म्हंटल तर तरी वडिलांना भीती वाटलीच.
त्यांनी झिंप्याच्या आत्याला फोन करून तिला काही माहिती आहे का ते विचारलं. तिला काहीच माहिती नव्हती. त्यामुळे तिला सर्व हकीकत सांगितली. तिने आणि झिंप्याने सावधपणे राहावे असे ही सुचवले.
झिंप्याची आत्या फारच घाबरली होती. तिने झिंप्याला फोन करून लवकरात लवकर घरी यायला सांगितले. वडिलांच्या फोन वरचे बोलणे त्याला ही सांगितले.
दोन दिवसांनी झिंप्याच्या आत्याला आसाम पोलिसांचा फोन आला. त्यांनी तिचा भाऊ व त्याची बायको यांचा वाईट रीतीने खून झाल्याची बातमी दिली.मळ्यातील एखाद्या कामगाराचं कृत्य असावं असं त्यांचं म्हणणं होत. पण आत्याला वेगळाच संशय येत होता.
तिने झिंप्याला संघ्याकाळच्या आता घरी पोचायला सांगितलं. झिंपा चार साडेचारला घरी आला तर त्याला आत्याचं विद्रुप प्रेतच बघायला मिळालं. एवढ्यात त्याला कोणीतरी हाक मारत आहे असा भास झाला. त्याच्या लक्षात अचानक पांढरे भूत आले. आणि तो पळत पळत माझ्याकडे आला.
मला ही सांगितल्यामुळे त्याने मला ही धोक्यातच टाकले आहे. मला ही कधी हाक ऐकू येतात. याचा अंदाज द्यावा लागेल.
आणि हो !!
तुम्ही सुद्धा सावध रहा. तुम्हालाही सुझी बद्दल माहित झाले आहे. आता तुम्हाला ही पांढऱ्या भुताच्या हाका ऐकू येऊ शकतात.
[नादभय ह्या आगामी संग्रहातून]
हे एक झेंगटच झालं म्हणायचं!
हे एक झेंगटच झालं म्हणायचं!
आवडली बरका गोष्ट
बापरे आता आम्ही काय करायच?
बापरे आता आम्ही काय करायच?
कथा मस्त
मस्त आहे कथा.
मस्त आहे कथा.
आता आम्हाला पण कळलं ना सुझीबद्दल.
प्रेडिक्टेबल.. पण मस्त...
प्रेडिक्टेबल.. पण मस्त... जपून राहिले पाहिजे..
कथा वाचून प्रतिसाद दिलेले
कथा वाचून प्रतिसाद दिलेले सगळे जण कसे आहात??
मला पण कळलं ना आता सुझी बद्दल.
बापरे !
बापरे !
छान लिहीता अविनाशजी तुम्ही.
छान लिहीता अविनाशजी तुम्ही.
काल रात्री खिडकीत कोणी तरी होते. सुझी तर नसेल ना?
आज तर सूझीने व्हाट्सआपलाच
आज तर सूझीने व्हाट्सआपलाच दसऱ्याचा मेसेज पाठवला
बहुतेक तो अनेक ग्रुप मध्ये फिरलाय
म्हणजे आता आम्हाला सर्वाना सूझी स्टोरी कळली
सावध राहायला पाहिजे तर
मस्त !
मस्त !
अंदाज आलेला तसा मध्यावरच...
बाकी आमच्या शेजारी एक सूझी नावाची कुत्री राहायची. मी असेही तिने हाक मारली की घाबरायचो.. आता तर गळ्यात हाडकांची मळ घालूनच फिरावे लागेल
मला कोणीतरी हाक मारतंय, काय
मला कोणीतरी हाक मारतंय, काय करू?
पण पांढरे भूत नाव का बरे ?
पण पांढरे भूत नाव का बरे ? कथा मस्त!!!
पांढरे भूत नाव का बरे>>>>
पांढरे भूत नाव का बरे>>>>
कारणईसुझी गोरी आहे
पांढरे भूत नाव का बरे>>>>
पांढरे भूत नाव का बरे>>>>
अंधारात काळे भूत दिसणार आहे का...
:- :-_ ळ
LOL