स्वातंत्र्याचे अनुभव
गेले खूप दिवस मी मायबोलीवर भरपूर माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे लेख वाचत आहे. घरापासून दूर माझ्या घराची आणि संस्कृतीची आठवण करून देणारी ही मायबोलीवरची माणसे अगदी कुटुंबसारखी वाटू लागली आहेत. इतके दिवस विचार करत आहे की मे पण काहीतरी लिहावे, ही इच्छा मनात आहे. पण कुठल्या विषयावर लिहावे हा प्रश्नच होता. मला माझ्या कामासाठी खूप लिहावे लागते.. पण ते सगळे इंग्रजीमध्ये आणि ते देखील वैद्न्यानिक भाषेत. त्यामुळे विषय निवडने तसे अवघडच होते! काल माझ्या मैत्रीणिंबरोबर गप्पा मारताना आमच्या लक्षात आले की आमच्यासारख्या मुलींच्या गोष्टी सांगणारी पुस्तके, लेख, सिनेमे तसे कमीच आहेत.