संशोधन उंदराचे
एकदा एक शास्त्रज्ञ करीत होता प्रयोग
दारु सोडवण्यासाठी कशाचा होइल उपयोग ?
उंदरावर प्रयोगाचा संकल्प सोडला
एक बाटली व्हिस्की , सोडा अन चाकना मागवला
एक पेग उंदरासाठी भरला
उंदीर म्हणाला कंपनी हवी मला
मग त्याने अजून एक पेग भरला
म्हणे उंदीर पहीला थेंब दे देवला
शास्त्रज्ञ म्हणे देव मी मानत नाही
उंदीर म्हणाला भांगेशिवाय शिवाला भजत नाही
बुध्दीश्वराचे वाहन मी, तुला फॉर्म्युला देणार नाही
शास्त्रज्ञाने उंदराला कडक सॅलुट मारला
खूप वेळ पिणे झाले
उंदराचे डोके फिरले
म्हणे आत्ता मी शुर सरदार
मनीम्याऊ माजलीय फार
रोज, रोज करते बेजार
मांजरीला आज करतोच ठार
मग मी तुझ्याकडे वळेल
खाणे तुझे बिळात पळेल
तुम्ही लोक स्वार्थी फार
पिंजरे ठेवता घरभर
शेवटी करशील माझ्याशी करार
संशोधनाचे पेट्न्ट माझ्या नावावर
मिळेल खूप पैसा, प्रसिद्धी, इज्जत
मरावे लागणार नाही पिंपात भिजत
ऐकून सारे शास्त्रज्ञाची उतरली
म्हणाला उंदरांपुढे मती माझी हरली
दत्तात्रय साळुंके
मस्त! खुप आवडलं...
मस्त! खुप आवडलं...
>>बुध्दीश्वराचे वाहन मी, तुला फॉर्म्युला देणार नाही>> +१
भारीच...
भारीच...
राहुल , शिवाजी खूप, खूप
राहुल , शिवाजी खूप, खूप धन्यवाद !