अस्वस्थ मी, संत्रस्त मी
जन्मांतरीचा पांथस्त मी
सेवुनीया सर्व अन्न ब्रम्हा
अधाशी उपाशी असा हीन मी
सुखावलो ना कधी शब्द ब्रम्हे
शोधुनी सर्व साहित्य अतृप्त मी
गुंतुन सदा तुझ्या नाद ब्रम्हा
अस्तीत्व माझे अन माझ्यात मी
सहवास अवघा क्षणाचा मिळावा
नुरावा दुरावा, उरावा न मी
मयुरेश, मित्रा हे विडंबन नक्की नाही तुझ्या विचारांचे
नक्कल करणे आहे तुझ्या हुकमी हुंकाराचे
------------------------------------------------
कसा अडकलो कोण जाणे
तिच्या सावळ्या केशपाशात
आत आत गुंतत गेलो
घुसमटत घुसमट्त अजाणवयात
एक दिवस माझे मलाच कळले
जिच्या संगतीत मी घालवला एकेक क्षण
दु:खाचा वा वेदनेचा
माझा भास होता
ती पण जळते माझ्या बरोबर, दु:खाच्या क्षणी
सोडते सुस्कारा आपल्या खोल वेदनेचा
उशीरा कळले ती आहे अभिसारीका
कोणाच्याही हाती जाणारी
अग्नीच्या साक्षीने
आभास निर्माण करणारी
साहचर्याचा, सहवेदनेचा
ह्रदयापाशी नेली म्हणजे
क्षणभरासाठी मती गुंग करणारी
नेहमी प्रमाणे सोमवार उजाडला. रविवारच्या सुट्टीचा आनंद घेऊन चाकरमाने कामावर वेळेवर रुजु झाले. ही चाकरीची चाकोरी मान्य नसलेले चाकरमाने उशीरा का होईना रुजु झाले. सरकारी,निमसरकारी ऑफिसमधे उशीरा येण्याची चैन परवडते कारण साहेबच उशीरा येत असतात आणि तो पर्यत मस्टर उघडे असते. मग काही नेहमी प्रमाणे उशीरा आले.