"द सर्कल" (The Circle) च्या निमित्ताने
Submitted by चौकट राजा on 3 August, 2017 - 15:54
काल मी "द सर्कल" (The Circle) चित्रपट पाहिला. भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे कि नाही ते मला माहिती नाही. पण अमेरिकेत थिएटरांमधे येऊन गेला आणि आता नेटफ्लिकस इ. ठिकाणी उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट आहे "द सर्कल" ह्या सोशल नेटवर्किंग कंपनी / वेबसाईट बद्दल आणि चित्रपटाचा विषय आहे अशा वेबसाईट्स नी घेतलेला आपल्या जीवनाचा ताबा. समाजात डोळे (आणि बुद्धी) उघडी ठेऊन वावरणार्या अनेकांच्या डोक्यात हा विचार चाललेला असेलच! "द सर्कल" फक्त तो विचार विस्तृतपणे दाखवतो आणि आपले डोळे अजून उघडतात. फेसबूक, व्हॉट्स अॅप चे नाव न घेता हा चित्रपट त्याबद्दल थेट भाष्य करतो.