अस्सल भारतीय मर्दानी सौंदर्य - प्रभास !
Submitted by ऋन्मेऽऽष on 8 May, 2017 - 11:24
कटप्पाने बाहुबलीला का बरे मारले असावे? सैराट झाला होता का तो? का येडं लागलं होत त्याला?
गेले वर्षभर हा प्रश्न सर्वांच्या डोक्यात घोंघावत आहे. उद्याचा शुक्रवार संपता संपता सर्वांना याचे उत्तर मिळाले असेल. भले तुम्ही चित्रपट पाहिला असेल नसेल तरीही, आणि तुमची ईच्छा असो नसो तरीही, व्हॉटसपवर येणारा एखादा मेसेज याचे उत्तर तुम्हाला सांगून जाणारच. आणि वर्षभर जे तर्कवितर्कांचे उधाण आलेले त्याला पुर्णविराम मिळणार....