बदला
Submitted by kotwalsk on 25 June, 2021 - 06:14
दिनांक २१ फेब्रुवारी २०५७: एक अंत्ययात्रा चाललेली आहे, शहरातले सर्व आणि देशातले काही दिग्गज पोलिस अधिकारी, राजकारणी, वैज्ञानिक आणि व्यावसायिक जमलेले होते. स्वतः श्रीमती तेजस्विनी विष्णू कुलकर्णी पुढे चालल्या होत्या, अर्थातच, अंत्ययात्रा त्यांच्या पतीची डॉ. विष्णू कुलकर्णी यांची होती. तेजस्विनीला माहित होते कि येथे जमलेला एकूण एक व्यक्ती हा फक्त उद्या येणाऱ्या वर्तमानपत्रात येणाऱ्या फोटोत दिसण्यासाठी इथे जमलेला होता. प्रत्यक्षात जरी विष्णू कुलकर्णी यांनी कुणाशी शत्रुत्व केले नाही तरी त्यांच्या कर्तुत्वाने त्यांना भरपूर शत्रू मिळाले होते.