गौराक्का!!!
''गौराक्का, गौराक्का", राजूच्या हाकेकडे दुर्लक्ष करत, तिने हातातल्या दगडावरची पकड घट्ट केली आणि सर्वात उंच असलेल्या चिंचेवर नेम धरला. एक, दोन, तीन....म्हणत दगड भिरकावणार, इतक्यात आतापर्यंत अंगणात उभा राहून हाका मारणारा राजू जवळ आला होता. तिच्या हाताला धरून ओढंतच घराकडे नेऊ लागला. 'गौराक्का चल, काकूने बोलावलंय तुला लगेच.' 'थांब रे! ती चिंच पाडू दे, काय कटकट लावलीस, येते सांग आईला.' 'नाही काकूने लगेच बोलवलंय, चल.' राजूने धोशाच लावला. 'काकूचा चमचा कुठला, चल.' असे म्हणत नाईलाजाने तिने हातातला दगड खाली टाकला आणि राजूच्या खांद्यावर हात टाकून चालू लागली.