परतफेड!!! - भाग २
'नकार कळवलांत ना सकाळी? मग आता इथे क्लीनिकमध्ये? का आलात तुम्ही?', साशंक स्वरात सारिकाने विचारले. तसा एव्हढावेळ पायाकडे टक लावून बसलेल्या प्रसादने डोके वर काढले अन मिश्कीलपणे सारिकाला म्हणाला, 'क्लीनिकमध्ये येण्याआधी पेशंटला परवानगी घ्यायला लागते कि काय तुमच्याकडे?
'पेशंट आणि तू? काय झालं?'
डाव्या पायाच्या अंगठ्याकडे निर्देश करत प्रसादने पायाची जखम दाखवली.
'छोटासा ऍक्सिडेंट झाला, इथेच पुढच्या चौकात, म्हणून इथे आलो.'
'सॉरी, माझा जरा गैरसमजचं झाला, बस् तू…मी…नर्सला बोलावते अन ड्रेसिंग करायला सांगते.'
'हम्म, आजारी पडल्यांवर एका डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरची गरज पडतेच, नाही का?’, म्हणत प्रसादने डोळे मिचकावले अन सारिकाच्या डोळ्यांत काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत प्रसाद बोलला, ’नकाराने वाईट वाटण्यापेक्षा आनंदचं झालेला दिसतोय तुला'.
'अअअ, तसे काही नाही.'
'तुझे डोळे तर तेच सांगतायत.'
'अअ.....'
‘Its ok, I wont force you. खरंतर जवळपास डझनभर मुलींना नकार दिलाय मी, पण तू पहिलीचं जिने मला नकार दिला, त्यामुळे जरा...'
'नकार? आणि मी? अरे तूच नकार कळवलास ना सकाळी?'
'हम्म….मी प्रत्यक्षात कळवला अन तू अप्रत्यक्षपणे.'
'म्हणजे?...'
'तुझा नकार तुझ्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होता, सारिका!’
'म्हणजे? तुझा नकार नव्हता?'
'आताही नाहीये, तुझ्या आईचा उत्साह ओसंडून वाहत होता मला भेटल्यांवर. मग म्हटलं होकार कळवून तुला कशाला पेचात टाका?', डोळे मिचकावत प्रसाद म्हणाला.
'अरे....पण तुला कसं कळलं मला लग्न करायचं नाहीये म्हणून?'
'सारिका! डोळे फार बोलके आहेत तुझे, तुझी इच्छा नसतानाही सगळं बोलून जातात.'
'अन, तू फार मनकवडा आहेस.... खरं सांगू...तुझ्यात न आवडण्यासारखं काहीच नाहीये. पाहताक्षणी मलाही आवडलांचं होतास. पण….माझ्या भूतकाळाच्या सावल्या मला भविष्याची स्वप्नं रंगवण्याची परवानगी देत नाहीत', हतबल होत सारिका बोलली.
'या सावल्यांमध्ये तुझ्या भविष्याचा आधार व्हायची ताकद आहे का?', तेव्हढ्याच निर्धाराने प्रसादने विचारले.
' अअअ…..खरंतर......नाही……'
'मग का अडकून पडतेस त्यांच्यात, अजून खूप आयुष्यं पडलंय तुझ्यापुढे. अन तुझी तयारी असेल तर मी तुझी साथ द्यायला अजूनही तयार आहे.' प्रसादच्या या अशा बोलण्यावर मात्र सारिका निरुत्तर झाली. थोडा वेळ तसांच गेला निरुत्तर शांततेत. तितक्यात नर्स आली अन ड्रेसिंगची तयारी करू लागली.
'थांबा सिस्टर! तुम्ही जा, मी करते ड्रेसिंग', कसलासा विचार करून सारिका बोलली. अन 'बरं', म्हणून नर्स आल्या पावली परत गेली.
सारिकाच्या अलगद स्पर्शाने कळवलेल्या होकाराने प्रसाद मनोमन सुखावला, अन एकटक तिच्याकडे पाहत राहिला.
'खरंच ऍक्सिडेंट झाला होता कि मला परत भेटायचं होतं म्हणून, हे सगळं....', सारिकाच्या मिश्किल प्रश्नाणे प्रसादची तंत्री भंगली.
'ऍक्सिडेंट सकाळीच झाला होता…..तुला पाहिल्यांवर, जखम आता झाली….गाडीवरून पडल्यांवर', प्रसादच्या तितक्याच मिश्किल उत्तरावर दोघेही मनमोकळे हसले.
‘'प्रसाद! तुला माझा भूतकाळ जाणून घेण्याची इच्छा नाहीये का?'
'नाही अजिबात नाही. कारण तो मला माहीत आहे, आणि तू जो करतीयेस तो शुद्ध वेडेपणा आहे हेही माहीत आहे. तुझ्या बाबांनी सांगितलंय सगळं मला. अवघ्या महिन्याची होतीस तेव्हा आईबाबांनी तुला दत्तक घेतलं अनाथाश्रमातून. एक आपलं अन एक अनाथ मुलं वाढवायचं असं त्या दोघांनीं खूप आधीचं ठरवलं होतं अन त्यांनी तसं केलंही. ज्या आईबाबांनी आपल्यासाठी एवढं सारं केलं, उतारवयात त्यांना साथ देऊन त्यांनी केलेल्या उपकारांची परतफेड करायची आहे तुला. अन म्हणून लग्नासाठी नकार....बरोबर ना?’
'तसं पाहिलं तर एखादा मुलगा दत्तक घेऊन उतारवयाची तरतूद करणं त्यांना सहजशक्य होतं. तरीही पदरी पहिली मुलगीच असताना त्यांनी मला दत्तक घेतलं हे उपकारचं नाहीत का? अन आता त्यांच्या उतारवयात त्यांच्या आधाराची काठी व्हायचं सोडून स्वतःचा संसार कसा थाटू?’
'हाहाहा! प्रश्नही तूच विचारतेस अन उत्तरही तूच देतीयेस. तूच म्हणालीस ना मुलगा दत्तक घेऊन त्यांना उतारवयाची तरतूद करता आली असती पण त्यांनी तसे नाही केले. काहीतरी विचार करूनच त्यांनी असे केले असेल ना. अन मला एक सांग, तू लग्न न करता त्यांच्याबरोबर राहिलीस तर त्यांना आनंद होईल असे वाटते का तुला? अन त्यांच्या आधाराचंच म्हणशील तर तो काय बरोबर राहूनच देता येतो का? आता माझंच बघ, माझे आईबाबा कुठे माझ्याबरोबर राहतात? ते राहतात तिकडे कोल्हापुरात आमच्या गावी. याचा अर्थ असा होतो का, कि ते निराधार आहेत. गरजेच्यावेळी आम्ही एकमेकांचा आधार होतोच कि...'
‘बरीच तयारी करून आला आहेस', मिश्किल हसत सारिका म्हणाली.
'मग काय, कुठलाही पेपर सोडवण्याआधी सगळी तयारी करूनच जायचं अशी सवयच आहे आपली, अगदी लहानपणापासून...काय मग सुटलाय ना पेपर? झालो कि नाही पास...', सारिकाच्या डोळ्यांत डोळे घालत प्रसादने विचारले.
तसे 'हो', म्हणत सारिका गोड लाजली…..
गोष्टीचा शेवट.....सारिका अन प्रसादची नवी सुरुवात!!!
(No subject)
सकारात्मक शेवट आवडला. पहिल्या
सकारात्मक शेवट आवडला. पहिल्या भागात अपेक्षा उंचावल्या होत्या . दुसरा भाग त्या तुलनेत थोडा कमी पडला .
असो लिहीत राहा. पुलेशु
Chan ...short n sweet story
Chan ...short n sweet story
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
जाई, खरा खुरा प्रतिसाद
जाई, खरा खुरा प्रतिसाद नोदवल्या बद्दल तुझेहि आभार. पुढची पोस्ट लिहिताना हि गोष्ट नक्कीच लक्षात ठेवीन
इथे या वाक्या ऐवजी
इथे या वाक्या ऐवजी
'हम्म, आजारी पडल्यांवर.....?’
हे वाक्य हवे आहे का
"हम्म, जखम झाल्यावर, एका डॉक्टरला दुसऱ्या डॉक्टरची गरज पडतेच, नाही का?"
छान लिहलय. पु.ले.शु.
छान लिहलय. पु.ले.शु.
(No subject)
छान आहे गोष्ट
छान आहे गोष्ट