स्वप्न ऐन रंगात असताना दाणदिशी टीरीवर दणका बसला, खडबडून जाग आली. “ए हरामखोर...वाजले बघ किती...पेपर आहे ना आज? पेपरला कोण बाप जाणार आहे का तुझा ?” स्वप्नाचा पार चुराडा झाला होता. सकाळी सकाळी मधुरवाणी कानावर पडली, पेंगतच पप्पांकडे बघू लागलो. “ए ##घाल्या...उठ कि आता...” तसा पुन्हा एकदा खडबडलो. वेळ बघायला घड्याळात पाहिलं, आई शप्पथ...मी पळतच बाथरूम मध्ये शिरलो. पटापट आवरून मम्मी-पप्पांच्या पाया पडून परीक्षेसाठी निघालो. आज उशीर होणार म्हणून, लांब लांब ढेंगा टाकत मान खाली घालून निघालो होतो. सकाळची वेळ असल्यामुळे वर्दळ खूप विरळ होती. मागे असलेलं दप्तर खाड्खुड आवाज करत माझ्या चालीवर डुलत होत.
नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे?
प्रत्येकाला आपल्या शाळेच्या बऱ्याच आठवणी असतात. आणि त्या आठवणी खरंच खुप अनमोल असतात. प्रत्येकाच्या काही भन्नाट आठवणी असतील यांत शंकाच नाही. खरंतर शाळेचे दिवसच खुप वेगळे असतात. जगातली कुठलीच किंमत देऊन ते परत नाही मिळवता येणार. कधीच नाही.
आज आॅफिसच्या लंच टाईम मध्ये असाच एक शाळेतला किस्सा आठवला, खुप हसलो. तुमच्याशी शेअर करण्याचा मोह नाही आवरला. म्हणुन....
मित्रहो ! रोजच्या या आपल्या धकाधकीच्या रूटीन मध्ये आपण खुप स्ट्रेस घेतो, परीणामी आपल्याला ते सर्व स्ट्रेस घालवण्यासाठी विविध मार्ग अवलंबावे लागतात, जसं की, मेडिटेशन, लाफिंग थेरपीज, मसाज, योगा.... वैगेरे वैगेरे, पण कधी हा विचार केलाय का ? की जर आपल्याला स्ट्रेस घेण्याची वेळच नाही आली तर? हो हे शक्य आहे... अर्थात मी इथे कोणत्याही प्रकारची अॅडव्हरटाईज करत नाहीये....स्ट्रेस घालवण्याचा सर्वांत सोप्पा आणि जालीम मार्ग म्हणजे, "हसणे." सर्वच नाही पण बरेचसे म्हणतात, " हसण्यासाठी वेळ काळ असतो," किंवा हसण्यासाठी कारण असावं लागतं..... वाॅटएव्हर. पण पर्सनली मला तर अजिबात तसं नाही वाटत.