मित्रहो ! रोजच्या या आपल्या धकाधकीच्या रूटीन मध्ये आपण खुप स्ट्रेस घेतो, परीणामी आपल्याला ते सर्व स्ट्रेस घालवण्यासाठी विविध मार्ग अवलंबावे लागतात, जसं की, मेडिटेशन, लाफिंग थेरपीज, मसाज, योगा.... वैगेरे वैगेरे, पण कधी हा विचार केलाय का ? की जर आपल्याला स्ट्रेस घेण्याची वेळच नाही आली तर? हो हे शक्य आहे... अर्थात मी इथे कोणत्याही प्रकारची अॅडव्हरटाईज करत नाहीये....स्ट्रेस घालवण्याचा सर्वांत सोप्पा आणि जालीम मार्ग म्हणजे, "हसणे." सर्वच नाही पण बरेचसे म्हणतात, " हसण्यासाठी वेळ काळ असतो," किंवा हसण्यासाठी कारण असावं लागतं..... वाॅटएव्हर. पण पर्सनली मला तर अजिबात तसं नाही वाटत. जेव्हाही वेळ येईल तेव्हा मनसोक्त खळखळून हसावं. उलट आपल्या आजुबाजुला होणाऱ्या घडामोडीच खुप झाल्या हसण्यासाठी, फक्त तशी नजर हवी, आणि तशी आकलनता हवी. स्वतःच सिच्युएशन आकलन (इमॅजिन) करून स्वतःच हसायचं. आपल्या मनावरील ताण-तणाव कमी व्हायला बरीच मदत होईल. असेच काही माझे किस्से, घटना, निरीक्षणं मी मांडत आहे.
चार-पाच दिवसांपूर्वीची गोष्ट, आॅफिसच्या कामानिमित्त मला लांब जायचे होतं, तसं बघायला गेलं तर मी माझा बाईक ला सोडुन कसलाच प्रवास करत नाही, हा जेव्हा गाडी ब्रेकडाऊन होते तेव्हाचा भाग वेगळा, पण सहसा मी विथ्दाऊट बाईक कुठेच जात नाही. मग तो प्रवास कीतीही लांबचा का असेना, परंतु त्या दिवशी म्हटलं आज जाऊ विथ्दाऊट बाईक, आणि असं ही लोकल ट्रांसपोर्ट ने बरेच दिवस फिरलो नाही. सो ठरलं ट्रेन ने जायचं. मला "मानखुर्द" या स्टेशन वर जायचं होतं, त्यासाठी मला "वाशी" मध्ये ट्रेन बदलावी लागणार होती. मी माझं ऑफिसच काम आटोपून परत निघालो होतो, वाशी मध्ये उतरल्यानंतर मी रिटर्न जाणाऱ्या ट्रेन मध्ये आलो, शेवटचं स्टेशन असल्यामुळे ट्रेन निघायला अजून बराच वेळ होता, आणि त्यात दुपारची वेळ असल्यामुळे ट्रेन पूर्ण रिकामी होती, काही मोजकीच डोकी दिसत होती, मी आत न बसता, बाहेरच दरवाज्यावर उभा राहून येणं-जाणाऱ्यांना न्याहाळत होतो. खूप फंन्नी होतं, मी नेमका सबवेच्या तोंडा जवळच्या दरवाज्यावर उभा होतो, कानात इअरफोन अडकवून. कोणी धावत यायचा, आणि पळत जाऊन खिडकीत बसायचा, मनात विचार यायचा ट्रेन तर अक्खी मोकळी आहे, तरीही हे असे पळून का आपला बी.पी. वाढवून घेत असतील कोणास ठाऊक. असे बरेच तारांबळ उडालेले प्रवासी, विनाकारण.... अरे ट्रेन ला अजून वेळ आहे तरी पण....? कोणी, आपण राजा आहोत या ऐटीत प्लॅटफॉर्म वर फेऱ्या मारत, कोण साऊथ चा सुपरस्टार असल्यासारखा त्या सबवेतुन बाहेर यायचा, जाम इंटरेस्टिंग होतं ते सगळं, त्या सबवेतून आता कोण आणि कसा बाहेर येणार हे इमॅजिन करून हसत होतो, अंदाज लावत होतो, काही मुलींचा घोळका यायचा त्यांची अवस्था तर इकडे जाऊ कि तिकडे अशी व्हायची. म्हणजे या दरवाज्याजवळ जाऊन परत पुन्हा पळत दुसऱ्या दरवाज्यावर. काही खिदळणारे कॉलेज ग्रुप, आणि उरलेसुरले फेरीवाले आणि मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेले काही लोकं,.....आज बऱ्याच दिवसांनी ट्रेन ने प्रवास करत होतो, जवळ जवळ ४-५ वर्ष, म्हणजे अगदीच नाही असं नाही, पण डेली एक ट्रान्सपोर्ट मीडिअम म्हणून बरेच दिवस झाले, मी आपला माझ्या कॉलेज च्या आठवणीं मध्ये रमलो, तितक्यात ट्रेन चा भोंगा वाजला, मी भानावर आलो. ट्रेन सुटायला अवघा १ मिनिट राहिला होता. मी बसायला म्हणून आत मध्ये वळणार तितक्यात आवाज आला, "अरे रुक ना मेरे लिये" तो आवाज सबवेतला होता. मी एकदम टक लावून तिकडे बघू लागलो, इतक्यात एक भारदस्त व्यक्तीमत्व त्या सबवेतल्या पायऱ्यांवरून बाहेर येत होतं. एक पंचविशी-सव्वीशीतला तरुण, जरा वजनानाने खूपच जास्त असा. तो अशाप्रकारे पळत होतं कि जणू एखादा चेंडूच टप्पे घेतोय. मला जरासं वाईट वाटलं, कारण पेलवत नसताना देखील तो तरुण आपला वजन घेऊन ट्रेन कडे धावत येत होतं अगदी जीवानिशी, इतक्या जोरात तर तो कधीच धावला नसेल, क्षणात तो त्या सबवेतून बाहेर आला, त्याच लक्ष आता मी उभा असलेल्या दरवाज्याजवळ होतं, कारण जवळचा दरवाजा तोच होता. तो एकदम मारक्या वळू प्रमाणे माझ्या दिशेने धावत येत होता, सुरवातीला वाईट वाटलं, पण थोड्याच वेळात अंगावर काटा आला, भीतीने...... मनात विचार आला हा जर येऊन असाच मला धडकला तर मी त्या शेवटच्या प्लॅटफॉर्मवरच जाईन सरळ. माझा जीव जाम घाबरा झाला होता, हा जर मला ठोकला तर, ??? पण आता काहीच करून फायदा न्हवता कारण तो जवळ जवळ पोहोचलाच होता. मी तिथेच एकदम दरवाज्याला रेटून, हाथाच्या मुठी आवळून, डोळे झाकून दरवाज्यात उभा राहिलो......त्या नंतर तो व्यवस्थित चढला होता, हुश्श !! मी आधी स्वतः कडे पहिला न एक सुटकेचा श्वास सोडला आणि बाहेर पहिल, मला पुन्हा शॉक....आता तर माझी पाचावर धारण.....लागली वाट, त्याच वयाची त्याच वजनाची एक तरुणी पुन्हा माझ्या दिशेने येत होती....माझी अवस्था अक्षरशः बघण्यासारखी झाली होती...ती तरुणी देखील चढली.......सुदैवाने ते दोघेही आपल्या आपल्या जागेवर सेफली स्थानापन्न झाले होते. दिसायला खूप गोड होते ते दोघे... मेबी कपल्स असावेत, पण ते महत्वाच न्हवता....ट्रेन सुरु झाली मी अजूनही तसाच दरवाज्यावर एकदम रेटून उभा होतो, पाय थोडेफार कापत होते, अक्षरशः घाम फुटला होता मला....थोड्यावेळाने मी झालो रिलॅक्स....मग तो मघासचाच सीन आठवून आपल्याशीच हसू लागलो.......
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
(लोकल ट्रेन वगैरे वाचल्यावर पुन्हा लेखकाचे नाव वाचले).
________________________________________________________________________________________________________________
रच्याकने, एक कायप्पा फॉर्वर्ड
फेसबुक नसते तर फक्त विश्वास नांगरे पाटील, अण्णा हजारे, मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर एव्हढेच लोक विचार करू शकतात असा विचार घट्ट झाला असता...
मस्त आहे किस्सा! छान.......
मस्त आहे किस्सा! छान.......
लिहिलय देखील मस्त...
अजून किस्से येऊ द्या.......
अजून किस्से येऊ द्या.......
छान लिहलय.
छान लिहलय.
एक पंचविशी-सव्वीशीतला तरुण, जरा वजनानाने खूपच जास्त असा. तो अशाप्रकारे पळत होतं कि जणू एखादा चेंडूच टप्पे घेतोय. >>> अगदी डोळ्यांसमोर तो तरुण उभा राहीला
सर्वांचे मनःपुर्वक आभार...
सर्वांचे मनःपुर्वक आभार...
धन्यवाद.....!!!! _/\_
धन्यवाद.....!!!! _/\_
वॉव मस्त किस्सा.
वॉव मस्त किस्सा.
लोकल ट्रेन म्हणजे माझ्या अगदी जिव्हाळ्याची.
खुप सारे किस्से आहेत,.आठवणी आहेत.
मला एक मजेशीर वाटलेली गोष्ट
मला एक मजेशीर वाटलेली गोष्ट अशी -
दुकानात एक बाई, ५ वर्षाची मुलगी, तीन वर्षाचा मुलगा व पाच सहा महिन्याचा मुलगा स्ट्रोलरमधे असे दिसले. बाईच्या हातात सामानाने भरलेली एक पिशवी होती.
मोठ्या मुलीने हट्ट धरला, मी घेते पिशवी, मी घेते पिशवी. आई म्हणाली अग ती जड आहे मोठी आहे तुला जमणार नाही, तेव्हढ्यात तीन वर्षाचा मुलगा धावत सुटला. त्याला धरायला म्हणून बिचार्या आइने ती पिशवी त्या मुलीकडे सोपवली, मुलाला पकडून परत आणले.
मुलाने बघितले, ताई पिशवी घेते, मला का नाही, म्हणून त्याने ताईशी हिसकाहिसकी, आरडा ओरडा सुरु केला. शेवटी आई म्हणाली दे त्याला ती पिशवी. मग जरा घुश्श्यातच नि हिरमुसली होऊन तिने पिशवी त्या मुलाला दिली. मग त्या मुलाने पिशवी धरली नि जमिनीवरून लोळवत लोळवत चालू लागला. ते बघून पाच सहा महिन्याच्या मुलाने भोकाड पसरून पिशवीकडे हात केले.
म्हणून ती पिशवी एकदाची त्याच्या हातात दिली. त्याने दोन सेकंद ती पिशवी धरली नि जमिनीवर टाकून दिली.
शेवटी पुनः पिशवी आईच्या हातात! दोन तीन मिनिटात हा खेळ संपला.
मस्त किस्सा... पण काही गफलत
मस्त किस्सा... पण काही गफलत होतंय का वयात... मोस्टली 9,10 महिन्यात बाळ चालायला लागते... 6 महिन्याचा बाळाने पिशवी 2 सेकंद उचलणे शक्य नाही हो...