कोणीतरी
गप्पांच्या ओघात बघ प्रवेशली पहाट
सगळीकडे दाटून आले धुके दाट दाट.
असं असावं आयुष्यात कोणीतरी
ज्याच्याशी बोलणं होईल थोडफार
हायसं वाटेल अगदी अन
मोकळा होईल मनावरील भार.
बोलण्याच्याही आधी कळावं जिला सारं.
मधूनच कुठूनतरी यावं सुखद गुलाबी वारं
कोणीतरी खास असावं असं आयुष्यात.
आयुष्यात पुढे जात राहावं ज्याचा पकडून हात.
असावं असं कुणीतरी ज्याने माझा आरसा व्हावं,
जगापेक्षाही खरं ज्याने माझं प्रतिबिंब दाखवावं.
प्रेमाच्या अन विश्वासाच्या धाग्याने विणलेलं घट्ट नातं असावं.
मनमोकळ्या संवादाच्या पलीकडे काही काही मागणं नसावं