Submitted by omkar_keskar on 28 April, 2021 - 01:24
गप्पांच्या ओघात बघ प्रवेशली पहाट
सगळीकडे दाटून आले धुके दाट दाट.
असं असावं आयुष्यात कोणीतरी
ज्याच्याशी बोलणं होईल थोडफार
हायसं वाटेल अगदी अन
मोकळा होईल मनावरील भार.
बोलण्याच्याही आधी कळावं जिला सारं.
मधूनच कुठूनतरी यावं सुखद गुलाबी वारं
कोणीतरी खास असावं असं आयुष्यात.
आयुष्यात पुढे जात राहावं ज्याचा पकडून हात.
असावं असं कुणीतरी ज्याने माझा आरसा व्हावं,
जगापेक्षाही खरं ज्याने माझं प्रतिबिंब दाखवावं.
प्रेमाच्या अन विश्वासाच्या धाग्याने विणलेलं घट्ट नातं असावं.
मनमोकळ्या संवादाच्या पलीकडे काही काही मागणं नसावं
उद्या फुटणाऱ्या अंकुरासाठी पावसाचं पाणी
जसं, मातीच्या उदरात मुरावं.
कालौघाने जगात केवळ आपलं द्वंद्व उरावं.
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान...!! सुंदर कविता...
छान...!!
सुंदर कविता...
छान!!
छान!!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
छान....
छान....