हुषार दिनू
Submitted by मिरिंडा on 10 November, 2016 - 11:37
एक होता दिनू. त्याची आई देवाघरी गेली होती. म्हणून त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी नवीन आई आणली. दिनूला ती आवडली. पण तिला दिनू आवडला नाही. दिनूचे बाबा बाहेरगावी कामाला जात. ते आठवड्यातून फक्त रविवारी घरी येत. आले की दिनूवर खूप प्रेम करीत. त्याला अभ्यासात मदत करीत. दिनू एक हुषार विद्यार्थी होता. त्याला लवकरच सगळे विषय कळत असत. त्यांच्या घरी एक कुत्रा पण होता. त्याचे नाव होते, " टिमू " . टिमू दिनुला नेहमी शाळेत सोडायला जाई. आणि त्याच्या शाळेतून यायच्या वेळीही जाऊन त्याला घेऊन येत असे. दिनूची नवीन आई मात्र दिनूला शाळेत जाईपर्यंत काम सांगायची. आणि केलं नाहीतर रागे भरायची. खायलाही द्यायची नाही.
शब्दखुणा: