सूक्ष्म जग आणि Quantum Physics
. . . . . वर वर पाहिलं तर Quantum Physics आणि व्यावहारिक जग ह्याचा फारसा संबंध वाटत नाही. तत्त्ववेत्ते जसे परमतत्त्वाबद्दल बोलत असतात तसेच हे गणितज्ञ multidimensional जगाबद्दल काहीतरी आकडेमोड करत बसतात असं वाटतं. पण ह्यातूनच तत्त्वज्ञान आणि Quantum Physics ह्यांच्यात एक दुवा तयार होतो. अस्तित्वाचे प्रश्न हाताळतांना mind आणि matter, आत्मा आणि देह असा दुहेरी विचार करावा लागतो. त्यापैकी जड देहाबाबतचं विश्लेषण साधारणतः पटकन समजतं पण आत्म्याबद्दल विचार करतांना तर्काधारित विश्लेषणाचाच आधार घ्यावा लागतो. तर्कशृंखला थोडीशी चुकली तरी ऐकणारा "तुम्ही फेकंफेकी करत आहात" असं म्हणून मोकळा होतो.