कामथे काका (भाग १६ वा०)
Submitted by मिरिंडा on 20 September, 2016 - 23:23
शिकलेली माणसं सूर्याला आवडत नसत. त्याच्या मनात येत राहिलं हा काका आला आणि आपल्या टोळीचे ग्रह फिरले. हा माणूस आपल्या लाइनमधला नाही असा इशारा त्याने किशाला कैकदा दिला होता. पण किशाने काकावर विश्वास ठेवला. आज सगळी टोळी या एकाच माणसामुळे बरबाद झाली . हा येण्यापूर्र्वी सगळं कसं ठीक होतं. त्याने एक दोन वेळा किशाला हेही सांगून पाहिलं की पेरियरवर विश्वास ठेव , पण शिकलेल्या माणसावर ठेवू नकोस. पण किशा वेगळा होता. तो माणसाला एकदम टाकून देत नसे. त्याच्यातलं जे उपयोगी आहे ते शोधून पैसा कमावणं हे त्याचं उद्दिष्ट होतं. किशा शिकलेला नसला तरी माणसं सांभाळण्याचं त्याला ज्ञान होतं.
शब्दखुणा: