तत्त्वज्ञान

तडका - लाचखोरी

Submitted by vishal maske on 17 September, 2015 - 20:16

लाचखोरी

प्रगत होणार्‍या समाजाचे
पाळे-मुळे शोषलेले आहेत
कित्तेक मोक्याच्या ठिकाणी
लाचखाऊ बसलेले आहेत

कितीही नाही म्हटलं तरी
त्यांच्या नैतिकतेत दुरी आहे
स्वार्थी मनात फोफावलेली
सर्रास लाचखोरी आहे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निशाणा

Submitted by vishal maske on 16 September, 2015 - 21:04

निशाणा

कधी सरळ-सरळ
कधी वाकडा-तिकडा
कधी भरभरून तर
कधी मात्र तोकडा

जसे विचार असतील
तसा वैचारिक बाणा
प्रत्येकाच्या नजरेतुन
वेग-वेगळा निशाणा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - निर्णय

Submitted by vishal maske on 16 September, 2015 - 09:24

निर्णय

कधी निर्णय योग्य असतात
कधी निर्णय गैर असतात
कधी सापन्नभावी तर
कधी भलतेच स्वैर असतात

काळ,वेळ अन् नियम पाहून
आपले निर्णय घेतले पाहिजेत
आपण घेतलेले निर्णय हे
इतरांनाही पटले पाहिजेत

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वर्गणी

Submitted by vishal maske on 15 September, 2015 - 20:37

वर्गणी

लोकसहभाग स्वेच्छेने असावा
जबरदस्ती ना लादली जावी
आपल्या कार्याने कळत-नकळत
आपली संस्कृती ना बाधली जावी

आपल्या हातानेच कधी-कधी
आपल्या प्रतिमा डागू लागतात
अन् वर्गणीच्या नावाखाली
कुणी खंडणीही मागू लागतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा

Submitted by vishal maske on 15 September, 2015 - 10:00

गल्लीत गोंधळ,दिल्लीत मुजरा

वेग-वेगळ्या संबंधांचेही
वेग-वेगळे ढगळे असतात
दाखवायचे दात वेगळे अन्
खायचे दात वेगळे असतात

कधी विरोध करता-करता
कधी-कधी दुजोरा असतो
गल्लीत गोंधळ करता-करता
दिल्लीत मात्र मुजरा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आंदोलनीय भाषा

Submitted by vishal maske on 14 September, 2015 - 20:38

आंदोलनीय भाषा

सामाजिक संघर्षाचे लकब
वारसाप्रमाणे ओढले जातात
वेग-वेगळ्या मागण्यांसाठी
आंदोलनंही छेडले जातात

आपले म्हणणे समजुन घ्यावे
एवढीच त्यातील आशा असते
कधी सौम्य तर कधी उग्र
आंदोलनीय भाषा असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वागणे

Submitted by vishal maske on 14 September, 2015 - 12:17

वागणे

वेग-वेगळ्या प्रश्नांसाठी
वेग-वेगळी शक्कल असते
तर कधी जुन्या पध्दतीचीही
नव्या-नव्याने नक्कल असते

वेग-वेगळ्या पध्दती नुसार
वेग-वेगळे मागणे असतात
ज्याच्या-त्याच्या विचारांनुसार
ज्याचे-त्याचे वागणे असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - टिका करताना

Submitted by vishal maske on 13 September, 2015 - 21:15

टिका करताना

कधी कशी कोणावर करावी
याच्यासाठी शक्कल लागते
किती प्रमाणात केली जावी
याची सुध्दा अक्कल लागते

तेव्हाच आपण केलेली टिका
सुपर-डूप्पर घडू शकते
नाहितर कधी आपली बाजु
आपल्याच बोकांडी पडू शकते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - जगी जगताना

Submitted by vishal maske on 13 September, 2015 - 10:04

जगी जगताना

जे काही पाहिलं जातं
त्यामध्ये मन वाहिलं जातं
पण न पाहिल्या गोष्टींचंही
कधी गुणगान गायलं जातं

आतुन वेगळं असतानाही
वरून वेगळं दिसलं जातं
दिसतं तसं नसतं म्हणूनंच
इथे जगही फसलं जातं,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - आपण

Submitted by vishal maske on 12 September, 2015 - 21:45

आपण

कुणी-कुणी काय केले आहे
यावर सर्वांचा डोळा असतो
दुसर्‍यांच्या प्रत्येक कामाचा
आपल्या मनात ताळा असतो

पण आपण काय करायला हवे
आपल्या लक्षात आले पाहिजे
अन् आपण जे करू शकतो ते
आपणहूनच केले पाहिजे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान