तत्त्वज्ञान
तडका - खिल्ली एक हत्यार
खिल्ली एक हत्यार
कोण कसली टिका करील
याचा काहिच नेम नसतो
असा नेता दुर्मिळ आहे की
ज्याकडे टिकेचा गेम नसतो
राजकारण करत असताना
टिका-टिप्पन्नी खेळली जाते
गंभीर आरोपांची बाजु देखील
खिल्ली ऊडवत टाळली जाते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका : घोषणाबाजी स्पेशल
घोषणाबाजी स्पेशल
आरडा-ओरडा करण्यासाठी
अंगात जोर भरला जातो
जीव पिळवटून गेला तरीही
घोषणांवर ताव मारला जातो
प्रत्येक घोषणाबाजी मधून
होणारे इफेक्ट सोशल असतात
म्हणूनच काहि कार्येकर्ते सदा
घोषणाबाजी स्पेशल असतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका - नावामागचे सत्य
नावामागचे सत्य
अपत्याचे काय नाव ठेवावे
हा अधिकार पालकांचा आहे
कोणी काहिही ठेऊ शकतो
हा प्रभाव विचारांचा आहे
मात्र पाल्याच्या भविष्याचीही
कधीच नावामुळे झलक नसते
ज्याच्या-त्याच्या कर्तृत्वानुसार
ज्याची-त्याची ओळख असते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका - व्यवस्थेतील तिमिर
अरमान था गुलशन पर बरसूँ
खूप दिवसांनी काल निवांतपणे गाणी ऐकत बसले होते. तलत महमूद ह्यांनी गायलेले इतना ना मुझसे तू प्यार बढा ऐकत बसले होते. त्यात एक कडवं आहे
अरमान था गुलशन पर बरसूँ
एक शोख के दामन पर बरसूँ
अफ़सोस जली मिट्टी पे मुझे
तक़दीर ने मेरी दे मारा
तडका - राजकीय डावात
राजकीय डावात
प्रत्येक मुद्दा लक्षात घेऊन
त्यावर आरोप सोडले जातात
विकासाचे मुद्देही कधी कधी
भलत्या वादात अडले जातात
मुद्दा कोणताही असला तरी
सहज वादामध्ये घेरला जातो
राजकीय डाव खेळत असताना
खोटा विश्वासही पेरला जातो
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका - "बोलण" एक कला
"बोलणं" एक कला
बोलु दिलं जात नाही
हि जाहिर खंत आहे
अनेकांच्या बोलण्यात
हाच मुद्दा फ्रंट आहे
जर कुठे बोलु दिलं नाही तर
गपगुमानपणे बसावं लागतं
मात्र बोलणं ऐकवायलाही
कौशल्यच असावं लागतं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
तडका - कायद्याचा खुटा
तडका - जबाबदार व्यक्तिंनो
जबाबदार व्यक्तिंनो
चर्चेत राहता येतं म्हणून
ऊगीच काहिही बरळू नये
स्वत:च्या असभ्यपणाचं
स्वत:च वलय तरळू नये
शब्द शस्र असतात हे
कळत नकळत पाळावं
जबाबदार व्यक्तींनी सदा
तारतम्य बाळगत बोलावं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३