कदंबातळी
कदंबातळी ती पुन्हा वाट पाहे नुरे भानही कोण जाणे कळा
वरी येत कानी खगाच्या लकेरी जणू वाजवी बासरी सावळा
नुरे सर्व वृत्ती पुढे अंतरींच्या निळा तेवढा व्यापूनि एकुटा
दिशाकाल भाना पुरे लोपले ते नसे जाणिवाही तये सर्वथा
जरी देह पाही कळेना तरी तो असे कृष्ण - राधा कुणासारखा
झुले एक छाया तिथे सावळीशी तीरी वाकुनीया जळा पारखा
![download_0.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u75357/download_0.jpg)
देशी फुलझाडांच्या मालीकेतील सातवे फुलं कदंब
उतरले निळे मोर दूरवर डोंगरात
घनपिसारे रुळती खोलवर कपारीत ...
सोनियाची गेंदफुले वाऱ्यावरी हिंदोळत
परिमळला कदंब मेघावलीच्या कवेत .
सुमनाजुक रोमांच अंगी त्याच्या लपेनात ...
वारा शिंपी थेंबासव गोकर्णीच्या लयीवर
तान हिरवी मादक वेलांटली तटावर
शेवाळल्या लिपीतून शिलालेख बोलतात ...
लोळुनिया गेली सर तृणदाट शय्येवर
गंध हिरवा मातट हिसळतो रानभर .
निखळली पैंजणाची थेंबघुंगरे जाळीत ...
रास सोनटिकल्यांची झिळमिळे गवतात
रंगथवे पाकोळ्यांचे लवलवती उन्हात .
पाणी पहेनल्या वाटा झुळुझुळू चालतात .
सातारंगांचे गोंदण सोनसळी कायेवर