मी आणि तू
वाऱ्यावर पदर तुझा झुलतो असा
जीव माझा होई वेडापिसा! || १ ||
कातिल अशी जादू नजर तुझी
धडधड वाढवी काळजापाशी! ||२ ||
स्पर्श तुझा भासे जणू स्वर्ग मला
मखमली तारुण्य तुझे मोरपिसा! || ३ ||
दिवसा तुझी भेट लाख मोलाची सखे
रात्री मी पाण्याविना मासा जसा! || ४ ||
हात तुझा हाती माझ्या, बळ जगण्याला
एकटा मी तुझ्याविना सांग जगू कसा? || ५ ||
© गणेश कुलकर्णी (समीप)
२१-एप्रिल-2019
वेळ : दुपारचे 12.09 मी.
साद मनाची अवचित येते
साद मनाची अवचित येते
भरल्या सांजेला
हुरहुरते मग शब्द असे हे
सजविती कवितेला
मनात येते दाटूनि काहूर आठवणीचे
आज होऊन च जाऊ दे ...
आज होऊन च जाऊ दे
नको अडऊ आज स्वतःला
सांग तुझ मन काय म्हणते
का तू गमावलं स्वतःला ...
उलटुन बघ ते आयुष्याच पान
जे मिटलं आहे तुझ्याचमुळे
पण शब्द अजूनही असतील तिथे
बघ त्यांचा अर्थ कळतो का तुला..
अश्याच एका वळणावरती आपण
भेटलो होतो फुलांच्या संगतीला
निर्माल्य झालीत ती तुझ्यासाठी
न गंध त्यांचा आजही छेळतो तुला
बघ फाटलेल्या डोळयांनी आज
चांदण खुप आहे तुझ्या भोवताली
पण तुझा चंद्र तू का गमावला
विचारून बघ तूच प्रश्न स्वताला
'कविता'
तुझ्या चाहुलीचा
रक्तिमा गाली
तुझे भास स्पर्श
तुझ्या चांद वेळी
तुझे हसणे ते
किती शब्द वेडे
झरावे ओठातुनी
तुझे गीत थोडे
तुझ्या धुंद श्वासात
क्षण मी गुंफते
अन् नकळत
तुझी कविता जन्मते
- प्रियांका विकास उज्ज्वला फडणीस.
______________________________________________
'तू दिलेला चंद्र'
तू दिलेला चंद्र सख्या
घट्ट उराशी जपलेला
किती घेतली त्याची काळजी
तरीही थोडा कोमेजला
कारण पुसले जेंव्हा त्याला
खिन्न उदाससा तो हसला
दावला त्याने आरसा मज
अगदी माझ्यापरी दिसला
तू दिसताच खुलला चेहरा
म्हणाला आता पहा स्वत:ला