पुण्याच्या जंक्शनवर फेरफटका
Submitted by पराग१२२६३ on 25 May, 2016 - 05:07
बरेच दिवसांनी पुणे जंक्शनवर सहजच गेलो. कोणत्याही रेल्वे स्टेशनवर जाणे आणि तिथे चाललेल्या सगळ्या रेल्वेविषयक घडामोडींमध्ये रममाण होणे हा तसा माझा छंदच. यातून मिळणारा आनंद काय हे कसे-कसे सांगायचे माहीत नाही. अलीकडे श्रमपरिहार म्हणून पुण्याच्या स्टेशनवर जाणे बरेच दिवस झाले नव्हते. परगावी जाण्याच्या निमित्ताने जाणे झाले, पण फेरफटक्यासाठी म्हणून झालेले नव्हते. म्हणूनच जरा मोकळा वेळ मिळाल्यावर पुण्याच्या जंक्शनवर जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय घेण्यामागे कारणही तसेच होते. निजामुद्दीन-पुणे दरम्यान नवी वातानुकुलित एक्सप्रेस त्या दिवशी सुरू होणार होती.
विषय: