भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणाऱ्या सैनिक समाचार या पक्षिकाचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला. सुरुवातीला 16 पानांचे ते साप्ताहिक केवळ उर्दू भाषेतून प्रकाशित होत असे. त्यावेळी या साप्ताहिकाच्या एका अंकाची किंमत होती एक आणा. कालांतराने इंग्रजी आणि अन्य भारतीय भाषांमधून फौजी अखबार प्रकाशित होऊ लागला. आज इंग्रजीसह 12 भारतीय भाषांमधून हे प्रकाशन प्रकाशित होत आहे.
'सैनिक समाचार' हे संरक्षण मंत्रालयाकडून प्रकाशित होणारे पाक्षिक प्रकाशन आहे. आज शंभर वर्षे पूर्ण होऊन गेलेले हे पाक्षिक इंग्रजीबरोबरच १२ भारतीय भाषांमधून नियमित प्रकाशित होत आहे. भारतीय लष्कराच्या चारही दलांमध्ये (भूदल, नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दल) होणाऱ्या विविध घडामोडींचा गोषवारा त्यातून प्रकाशित होत असतो. अर्थातच संरक्षणासारखा संवेदनशील विषय असल्याने अत्यंत गोपनीय, गोपनीय, संवेदनशील अशा विविध वर्गांमधील बाबी त्यात प्रकाशित केल्या जात नसतात. पण जी काही सामग्री प्रकाशित होत असते, तीही या विषयात रस असणाऱ्याच्या पसंतीला उतरू शकते.