ख्वाडा
Submitted by संदीप आहेर on 27 October, 2015 - 00:39
आज पर्यंत असंख्य सिनेमातून समोर दिसलेली गोष्ट, एक कुटुंब... खत्रुड बाप, कष्टमय आई, भाऊ.. वहिनी.. त्यात एक हिरो त्याचं लग्नाचं वय, त्यात एक हिरोईन, रोमान्टिक स्वप्न. जर हेच सगळं आहे तर हा सिनेमा एवढा गौरवला का गेला? भारतीय सिनेमाची सुरुवातच मुळी परीकथाचं चलचित्र रुप म्हणून झाली. मनोरंजनाचं साधनं म्हणून ते योग्यच होतं. पुढे हे केवळ मनोरंजनाचं साधन न राहता एक समाजमाध्यम म्हणून नावारुपाला आलं, स्त्री, पुरुष, श्रीमंत, गरीब, गुंड, सदगृहस्थ, शहरी, ग्रामीण, त्यात समाजातील सर्वांचीच योग्य दखल घेण्याचा प्रयत्न झाला.
विषय:
शब्दखुणा: