तुझे रूप चित्ती राहो

रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो - गणेश रेखाचित्र

Submitted by सावली on 28 September, 2015 - 02:37

१९९८/ ९९ साली केलेलं एक गणपतीचं रेखाचित्र. कुठलीतरी मूर्ती बघुन त्यावरुन हे चित्र काढलेले आहे.

रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो

Submitted by मामी on 23 September, 2015 - 09:14

केव्हाची मधुबनी स्टाईलमध्ये एखादं चित्रं रंगवायची इच्छा होती. या गणेशोत्सवातील या उपक्रमामुळे छान संधी मिळाली.

नेटवरून मधुबनी स्टाईलमध्ये एक गणपती सिलेक्ट करून घेतला. ठोबळमानानं तो मनात धरून त्यावरून मी गणपती चितारला. अर्थात ही शुद्ध मधुबनी आर्ट नाहीये कदाचित. हे फ्युजन असेल फारतर.

कागद : अजय पाटील यांच्या जलरंग शाळेकरता आणलेला तसाच पडून होता. हा कागद ३०० GSM चा आहे. आकार - ३७.५ x २७ cms

रंग : पोस्टर कलर्स - Chrome Yellow Deep Hue, Crimson, Poster Green

विषय: 

"रंगरेषांच्या देशा" - तुझे रूप चित्ती राहो..

Submitted by मॅगी on 19 September, 2015 - 14:55

|| मंगलमूर्ती मोरया ||

गेले दोन दिवस वेळ मिळेल तसे हळूहळू आमचे गणपतीबाप्पा अवतीर्ण झाले.
माध्यमः जलरंग, हँडमेड कागद

हे प्रत्येक पायरीचे फोटो:
१. एक पेन्सिल स्केच काढून त्यावर बेस वॉश दिला.

G1.jpg

२. अजून रंगकाम.. (ब्रेक घेऊन रंगवल्यामुळे, वॉशेस एकमेकात मिसळत नव्हते पण कसेबसे एकावर एक वॉश दिले..)

G2.jpg

३. थोडं डिटेलिंग आणि टचअप केलं.

G3.jpg

Subscribe to RSS - तुझे रूप चित्ती राहो