ओटॅपल (Oat + Apple) पाय/ क्रम्बल
बदललेले पदार्थ:
१) दुधी ऐवजी १ सफरचंद
२) गुळाऐवजी अर्धी वाटी मेपल सिरप (Grade A Dark Amber)
साहित्य:
१) एक वाटी ओट्स् आणि ४-५ बदाम, ४-५ अक्रोड घालून केलेले पीठ
२) अर्धी वाटी ओलं खोबरं (खरवडून)
३) तीन चमचे (tbsp) साजूक तूप
४) अर्धा चमचा वेलची पूड
५) मीठ चवीनुसार
तेलाची गरज पडली नाही.
क्रमवार कृती:
१) अवन २०० डिग्री सेल्सियस वर प्रिहिट करायला ठेवा.
साहित्य -
१) एक वाटी ओट्स्
२) एक वाटी ओलं खोबरं (खरवडून)
३) एक वाटी दुधी किसून (पाणी पिळून घ्या, नाहीतर सारण होईल)
४) अर्धी वाटी गूळ
५) दोन चहाचे चमचे आवडते ड्रायफ्रुट्स
६) अर्धा चमचा वेलची पूड
७) दोन चहाचे चमचे साजूक तूप
८) एक वाटी पाणी
९) मीठ
१०) तेल
कृती -
मोदकाची पारी - ओट्स् मिक्सरमध्ये फिरवून पीठ करून घ्या. एक वाटी पिठासाठी एक वाटी पाण्यात चवीनुसार मीठ व तेल घालून उकळवत ठेवा. उकळले की त्यात ओट्सचे पीठ घालून, ढवळून, झाकण ठेवून, एक वाफ आणून गॅस बंद करा. ही उकड हाताने मळता येईल एवढी थंड झाली की चांगली मळून घ्यावी.