मशरुम कबाब आणि मिनी पराठे
खरेतर असल्या पारंपरिक पदार्थाला शाकाहारी साज चढवून भ्रष्ट केल्याबद्दल शिक्षा म्हणून पूर्वीच्या नवाबजाद्यांनी (योग्य तिथे शीग लावून) तंदूरच्या तोंडीच दिले असते पण सरदारांनी संस्थाने खालसा करून तो धोका वेळीच संपवून टाकल्याने, आता ही रेसिपी लिहायला हरकत नाही.
साहित्य:
1. कबाबसाठी
पाच सहा मशरुम्स बारीक चिरून
एक मध्यम कांदा बारीक चिरून कुरकुरीत तळून घेतलेला
सहा सात लसूण पाकळ्या चिरून तळून घेतलेल्या
दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून (तिखटपणानुसार कमी-जास्त)
काजू दहा बारा
काश्मीरी तिखटपूड एक टी स्पून
धणे पावडर अर्धा टे स्पून
गरम मसाला एक टी स्पून