मशरूम्स!!!

Submitted by मामी on 11 August, 2015 - 13:57

लॉस एंजेलिसच्या फार्मर्स मार्केटमध्ये चक्कर मारताना एका स्टॉलवर फक्त मशरुम्स विकायला होती. किती विविध प्रकार! इतक्या प्रकारचे मशरुम्स प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तरी पहिल्यांदाच पाहिले.

स्टॉलधारकाची परवानगी घेऊन ते सगळे प्रकार कॅमेराबध्द केले. ते फोटो इथे टाकत आहे :

हे आपले कॉमन - बटण मशरुम्स

किंग ट्रंपेट ऑयस्टर

हे मोठे मोठे - पोर्टबेलो

शँटरेल

मुस्राँ

पोर्चिनी

पिओप्पिनी

नेमको

ब्लू फूट ( यांचे दांडे खरंच निळे जांभळे आहेत)

वुड इयर

मैताके

लॉबस्टर मशरूम

आणि हे मशरूम संमेलन ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहाहा. इतके सगळे मशरूम्स बघून तोंपासू. मी शँटरेल ट्राय केले होते एका रेस्टराँ मधे (U.S. मधेच). नाही आवडले. कडवट चव वाटली. (मुद्दाम शँटरेल पिझ्झा मागवला आणी बहुतेक सगळे मशरूम्स बाजूला काढून ठेवले. तो वेटर म्हणाला असेल वेडीच दिसते ही).

आह्हा.. मस्तं भरलंय सम्मेलन.. चायनीज जनता भरपूर वाढलीये अमेरिकेत त्याचाच परिणाम असावा मशरूम
पैदावार .. Wink

सगळे खाऊन पाहिलेत्.. त्या वुड ईअर मशरूम्स ना मँडरिन मधे गाई चे कान असे नांव आहे.. Happy

मी पण तेच म्हणननार होतो. ..

चायनिज लोक बर्याच प्रकारचे मशरुम खातात. ह्यातले बरेच मशरुम खाउन बघिटलेत . पण किंग ट्रंपेट ऑयस्टर हा न्माझ्यासाठी नवीन आहे.

शिताके नव्हते तिथे.

हल्ली आमच्या घराजवळच्या फुडहॉलमध्येही बरेच प्रकारचे मशरुम्स असतात. शिताके, पोर्टबेलो वगैरे ५-६ विविध प्रकार असतातच.

मी पहिल्यांदा जेव्हा फुडहॉलमध्ये तळहाताएवढे मोठ्ठे पोर्टबेलो पाहिले तेव्हा खूप आनंद झाला होता कारण चीजकेक फॅक्टरीतलं पोर्टबेलो सँडविच मला खूप आवडायचं.

मामी, हे थर्ड स्ट्रीटवरचेच ना फार्मर्स मार्केट? की दुसरे कुठले आहे?

मश्रुम्स मला इतके आवडत नाहीत.. पण फोटो छान!

आपल्याकडे पावसाळ्यात हमखास पण अडगळीच्या ठिकाणे उगवणारे हे मशरुम्स पण भारी लागतात. नाव मात्र माहीत नाही. शिताके हेच का?
_MG_4897x.jpg

बस्के, नाही. तू म्हणतेस ते द ग्रोव्ह च्या शेजारचं ना? तिथे कुठे भाज्या बिज्या आहेत. नुसतीच खादाडी.

हे मार्केट आमच्या घरापासून अगदी जवळ - सेल्मा-इवार वर. दर रविवारी भरतं.

उनाड पप्पू ( सॉरी हां पण नाव लिहिताना जाम हसू आलं),

त्या फोटोत आहेत ते शिताके नाहीत. वर सायोनं लिंक दिली आहे त्यात दिसतील शिताके.

त्या स्टॉलवर नव्हतं पण सगळ्यात फेमस आणि महाग मशरूम म्हणजे ट्रफल - Truffle

European white truffles can sell for as much as $3,600 a pound, making them and their fellow fungi the most expensive food in the world. ( नेटवरून साभार.)

एकच दुकान असते नेहेमी भाज्या व फळांचे. >>> हो त्या दुकानातून आम्ही फ्रेश ज्यूस आणि फळं घेतली होती. आठवलं ते दुकान.

मस्त फोटो शेवटचा छान आहे क़लेक्तीव. कलर शेड्स कार्ड सारखे.

पर आज मेरा मॅजिक मशरूम खानेका मूड है.

बापरे, इतक्या प्रकारचे मशरुम्स असतात होय... सही.
फोटो पण मस्त आलेत. मशरुम्स गटग वाटतंय हे...

आता नीट गटगचे फोटो पाहिल्यावर वाटतंय की पुढच्या लायनीत आहेत शिताके मशरुम्स. शिवाय इतर काही, जे माझ्या इंडिव्हिज्युअल फोटोत नाहीत, असेही काही प्रकार आहेत. त्यांची नावं मला माहित नाही. कोणाला माहित असतील तर सांगा.

वाह मशरूम Happy मला खूप आवडतात.
मी ऐकलं आहे की मशरूम चे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन प्रकार आहेत म्हणे Uhoh खरं का?
हे नक्की कोणते आहेत? सर्वांची चव सेम लागत असेल का?

एकदा रात्री मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाताना घरी आईवडीलांसाठी हॉटेलमधून भाजी पार्सल सांगायची होती. नेहमीच्या कोल्हापुरी-जयपुरी, हंडी-कढाई पेक्षा वेगळे म्हणून पनीर मशरूम मसाला सांगितला. पहाटे कधीतरी घरी रिटर्न पोहोचलो. आईने तेव्हाही झोपेतून उठून शिव्या घातल्या. फ्रिजमध्ये पाहिले तर त्यांनी सगळी भाजी तशीच ठेवली होती, आणि वेगळे काहीतरी करून खाल्ले होते. अगदी त्यातले पनीरही खाल्ले नव्हते, ना ग्रेव्हीची चव बघितली होती, कारण सारेच मशरूमने बाटवले होते.

कारण त्यांच्यामते, मशरूम म्हणजे, त्याच त्या गावी रस्त्याच्या कडेने उगवणार्‍या, कुत्र्याच्या छत्र्या Happy

Pages