हे पुस्तक बरेच महिने टेबलवर पडून होतं पण काही केल्या वाचायला मुहूर्त लागत नव्हता याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. कारण पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चरित्रनायिकेचं नाव स्पष्ट लिहिलं आहे आणि तिचं प्रकाशचित्रही आहे. या राजबंदिनीच्या आयुष्याबद्दल फार सविस्तर माहिती मला नसली तरी एकंदर तिचं आयुष्य संघर्षाचं आहे हे माहिती होतं. पण नुकतंच वाचलेल्या ‘मीना’चे ठसे अद्याप ताजे होते, तोवर आणखी एक तसंचं संघर्षमय आयुष्य वाचायची मनाची तयारी होत नव्हती आणि त्यामुळे पुस्तक माझी वाट पहात होतं.
बहादूरशहाच्या कबरी नंतर मला स्कॉट मार्केट मधे जायचे होते. येंगॉनमधले स्कॉट मार्केट म्हणजे बाहेरून थोडेफार क्रॉफर्ड मार्केट सारखे. पण इथली दुकाने दागदागिने, कापडचोपड आणि हस्तकलेच्या वस्तूंनी भरलेली. वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ४. सुर्य लवकर मावळत असल्याने आसाम मेघालयात पण बाजाराची अशी वेळ बघितलेली. गेल्यागेल्या समोर खूपसारी खर्याखोट्या दागिन्यांची दुकाने. मला यात काही स्वारस्य नसल्याने गल्ल्या बदलून दुसर्या विभागात गेलो. इथे सगळीकडे कापडच कापड.
वैधानिक सूचना : हे प्रवासवर्णन तीन वर्षांआधी केलेले आहे. तरी यातील माहिती, प्रसंग, घटना आणि पात्रे यांचा आजच्या परिस्थितीशी संबंध मिळताजुळता असेल असे नाही.
म्यानमा -१
काहीतरी हटके ठिकाण बघायचे तेव्हा डोक्यात होते. गर्दी गजबज या सर्वांपासून दूर.. तरी आपल्या शहरी सुखसवयींना गोंजारणारे. गुगलवर एक एक शोधता शोधता ते ठिकाण अगदी शेजारीच मिळाले. म्यानमार.