इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी
इंदूर - भाग २ - रावेरखेडी
>>>"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला....
या पूर्वी एकदा कोणतीही माहिती नसताना आपल्या यकुने दिलेल्या सूचनांनुसार सराफा भेट झाली होती. त्यावेळी सराफा भन्नाट आवडला होता. त्यामुळे दिवसभराचा प्रवासाचा शीण विसरून सराफ्याला जाण्यास सज्ज झालो.
भुषणच्या घरच्यांसोबत थोड्या गप्पा मारून आम्ही सराफ्याकडे कूच केले.
रात्री १०:३० नंतरही सराफा असा फुलला होता..
"मनोज यावेळी नक्की इंदूर ला जावूया..."
हाफिसातला शेजारी आणि मूळचा 'इंदौरी' असलेल्या भुषणने पुन्हा एकदा इंदूरवारीच्या चर्चेला सुरूवात केली.
इंदूर, सराफा आणि ५६ दुकान या तीन गोष्टींमुळे या ट्रीपला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. आमचा सर्वात आधी ठरलेला बेत होता "इंदूरमध्ये होळी साजरी करणे" परंतु हाफिस आणि इतर कामांमुळे त्याला जमले नाही.
(म्हणून मी घाटवाटांवरची सायकल राईड करून आलो!)
इंदूरचा प्लॅन त्याला विचारताच त्याने पठडीतले उत्तर दिले.
"रात्री पुण्यात बसमध्ये बसायचे, सकाळी इंदूर. ११ / १२ तास लागतात!"