"मनोज यावेळी नक्की इंदूर ला जावूया..."
हाफिसातला शेजारी आणि मूळचा 'इंदौरी' असलेल्या भुषणने पुन्हा एकदा इंदूरवारीच्या चर्चेला सुरूवात केली.
इंदूर, सराफा आणि ५६ दुकान या तीन गोष्टींमुळे या ट्रीपला नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. आमचा सर्वात आधी ठरलेला बेत होता "इंदूरमध्ये होळी साजरी करणे" परंतु हाफिस आणि इतर कामांमुळे त्याला जमले नाही.
(म्हणून मी घाटवाटांवरची सायकल राईड करून आलो!)
इंदूरचा प्लॅन त्याला विचारताच त्याने पठडीतले उत्तर दिले.
"रात्री पुण्यात बसमध्ये बसायचे, सकाळी इंदूर. ११ / १२ तास लागतात!"
या प्रस्तावाला मी फारसा उत्सुक नव्हतो. बसचा इतका लांब प्रवास झोपून वगैरे करण्याला मला प्रचंड कंटाळा आहे. शेवटी गाडीवरून जावूया असा प्रस्ताव मांडला. त्यानेही लगेचच होकार दिला.
मी मे/जून महिन्यात सायकल घेतली त्या दरम्यान एकदा बुलेटही बुक केली होती. त्यावेळी बुक करतानाच "Royal Enfield Classic 350 Black" अशी सर्वात उशीरा मिळणारी आणि जास्तीत जास्त वेटींग पिरीयड असणारी गाडी बुक केली होती. कारण मला तेच मॉडेल आणि तोच रंग हवा होता. नंतर अंतर्जालावर (http://www.teambhp.com) वर बुलेट संदर्भात मिळेल ती माहिती वाचण्यास सुरूवात केली.
बुलेट 350 CC की 500 CC?
Classic की Thunderbird?
गाडी घेताना व नंतर काय माहिती आवश्यक आहे?
गाडी घेताना काय काळजी घ्यावी?
गाडी घेतल्यापासून मोठ्या राईडपर्यंत काय काळजी घ्यावी?
या दरम्यान शोरूमला फोन करून "मेरा नंबर कब आएगा?" टाईप्स प्रश्न विचारणे सुरू होतेच. १४० वेटींग वरून नंबर हळूहळू उतरत होता. ८०, ६२, ३५ असे नंबर कळत होते. या काळातच जोमाने सायकलींग सुरू असल्याने बुलेटची फारशी भूक लागली नव्हती. "येईल त्यावेळी येवूदे" अशा निराकार भावनेने बाकीचे उद्योग सुरू होते. यथावकाश वेटींग पिरीयड संपला. गाडी लवकरच ताब्यात मिळेल असे वातावरण तयार झाले. अगदी २० / २२ नंबर उरले तेंव्हा समीर साठे, सोन्याबापू मंडळींशी चर्चा करून आणखी माहिती मिळवली.
डिसेंबर महिन्यात बुलेट मिळाली!!!!!
आता छोट्या मोठ्या ट्रीप सुरू केल्या. पुणे-कोल्हापूर, पुणे-सांगली, पुणे-गणपतीपुळे, दोन तीनदा कोकण.. अशी गाडी पळवत होतो. पहिली दोन सर्विसींग पार पडल्यानंतर मोठ्या ट्रिपचा विचार सुरू केला आणि अचानक हा इंदूरचा प्रस्ताव आला.
इंदूरच्या प्रवासाचा रूट नक्की कोणता हे ठरत नव्हते.
पुणे-अहमदनगर-औरंगाबाद-भुसावळ-बुर्हाणपुर-सनावाद-इंदूर
पुणे-अहमदनगर-शिर्डी-कोपरगांव-मनमाड-मालेगांव-धुळे-पलासनेर-सेंधवा-जुलवानिया-इंदूर
पुणे-राजगुरूनगर-नारायणगांव-संगमनेर-कोपरगांव-मनमाड-मालेगांव-धुळे-पलासनेर-सेंधवा-जुलवानिया-इंदूर
हे तीन मार्ग होते. निव्वळ अंतराचा विचार करून मार्ग ठरवता येणार नव्हता कारण 'रस्ता कसा आहे?' हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता. आणखी एक महत्वाचा मुद्दा होता उकाडा आणि ऊन. ऐन उन्हाळ्यात मध्य भारतात जाताना या गोष्टीची काळजी घेणे गरजेचे होते.
शेवटी अनेक रूटची माहिती मिळवून "पुणे-अहमदनगर-शिर्डी-कोपरगांव-मनमाड-मालेगांव-धुळे-पलासनेर-सेंधवा-जुलवानिया-इंदूर" हा रूट ठरला आणि प्रवास थोडा सुसह्य व्हावा म्हणून गुरूवारी संध्याकाळी निघून २०० किमी अंतरावर शिर्डीमध्ये मुक्काम करावयाचे ठरले. राहिलेला टप्पा एका दिवसामध्ये सहज शक्य होता.
आता मोठ्या प्रवासाच्या दृष्टीने पुन्हा एकदा गाडीचे चेकिंग करून घेतले. प्रवासाआधीच्या वीकांताला चाकांमध्ये नायट्रोजन भरून सहजच एक २०० किमीची एक राईड करायची म्हणून खोपोलीला चक्कर मारली. गाडी चालवताना कंटाळा येत नव्हता आणि पॅशन प्लसच्या तुलनेत तुफान पॉवर आणि आराम मिळत होता.
यथावकाश गुरूवार उजाडला. हाफिसातले काम आवरून निघायला ५ वाजले. मी आणि भुषण, त्याच्या मागे एक मोठी सॅक आणि त्याला मागे टेकायला एक फळी जोडून त्याला एक उशी जोडलेली अशा यंत्रणेसह आम्ही अहमदनगर कडे कूच केले.
पहिला थांबा..
लोणीकंद, शिक्रापूर, रांजणगांव, शिरूर वगैरे गावे एका लयीत मागे पडत होती.. शिक्रापूरला आणि शिरूरला ट्रॅफीक लागले. कारण..? काही नाही. रस्त्यावरच्या दोन्ही बाजूच्या लोकांना एकाच वेळी इकडून तिकडे जायचे होते व काहींना यू टर्न घ्यायचा होता.
अभी इंदूर दूर है!
अहमदनगरच्या अलिकडे अचानक शिर्डी बायपास रस्ता दिसू लागला. हा रस्ता मला माहिती नव्हता आणि नेहमी बसने प्रवास करत असल्याने भुषणलाही काही माहिती नव्हती. चुकलो तर GPS ने रस्ता शोधू अशा तयारीने त्या रस्त्यावर गाडी वळवली.
१२ किमी पर्यंत सिंगल लेन एकदम गुळगुळीत पण कोणतेही मार्किंग नसलेला रस्ता.. मार्किंग नसल्याने या रस्त्यावर गाडी चालवताना कमी वेगाने जावे लागत होते. रस्ता तसा नवीनच असल्याने रस्त्याच्या कडेची माती आणि डांबरी पट्टे यांच्याकडे लक्ष ठेवून थोडे अंतर पार केले आणि लगेचच रस्त्याचे काम सुरू आहे अशा पाट्यांनी आमचे स्वागत केले.
..आणि येथे काम सुरू होते म्हणजे पूर्वी रस्ता होता आणि आता त्याची डागडुजी वगैरे प्रकार नव्हता तर सरळ नवीन रस्ता बांधण्याची तयारी सुरू होती. त्यामुळे दगडमातीच्या एका पट्ट्यामधून पर्यायी रस्ता काढला होता. असे तीन चार खराब पॅच आणि एकूण ६ / ८ किमीचे अंतर कूर्मगतीने पार करून आम्ही अहमदनगर शिर्डी रस्त्यावर चाके वळवली.
खराब रस्ता..
अहमदनगर शिर्डी हा मधून मधून सिंगल लेन रोड होता. सिंगल लेनवर गाडी चालवण्याची मजा वेगळीच असते. समोरून येणारी गाडी, आपण ओव्हरटेक करत असलेली गाडी आणि आपण अशी वेगवेगळी जजमेंट्स एकाच वेळी घ्यावी लागतात. एखादी कार आपल्याला ओव्हरटेक करून अचानक समोर येते, समोरून लाईट न लावता किंवा नेमका डावा लाईट लावून एखादा ट्रॅक्टर येतो असे अनेक प्रकार सतत घडत असतात. त्यामुळे सिंगल लेन रस्त्यावर गाडी चालवताना सतत सावध राहिल्याने कंटाळा येत नाही त्यामुळे हा प्रवास थोड्या कमी वेगाने पार पडला पण मजा आली.
सिंगल रोड..
साईसिद्धी, साईकृपा, साईछाया, साईराम अशा अनेक हॉटेलांमुळे शिर्डी जवळ आल्याची जाणीच झाली. शिर्डीच्या अलीकडे २० किमी पासून थोडा खराब रस्ता सुरू झाला. त्याने शिर्डीपर्यंत सोबत केली.
एक हॉटेल शोधले, चेक इन केले आणि फ्रेश होवून जेवणासाठी बाहेर पडलो. २०० किमी अंतरावर पहिला दिवस संपला होता..
(क्रमशः)
photos nahi disat....
photos nahi disat....
भारी रे...सायकल आणि बुलेट हे
भारी रे...सायकल आणि बुलेट हे भारी कॉंबो आहे तुझ्याकडे....
मस्त प्रवास सुरुये....अजून फोटो आणि डिटेल्स पाहिजेत
मला वाटलं सायकलने गेलास की
मला वाटलं सायकलने गेलास की काय इंदोरला !
फोटो अजिबात दिसत नाहीयेत.
फोटो अजिबात दिसत नाहीयेत.
कोलार ते कोपरगाव!! जगातला
कोलार ते कोपरगाव!! जगातला सगळ्यात खराब रस्ता... गेली दोन वर्षे तस्साच होता... (अजूनही तसाच आहे का?)
पुणे-कोलार तीन तासात गेल्यावर या पुढच्या चाळीस किमी साठी दीड तास लागायचा!
कोपरगाव-मनमाड-मालेगाव - awwesome रोड... गुळगुळीत टू लेन टार रोड...
छान.
छान.
अरे व्वा..... उशी वगैरे
अरे व्वा..... उशी वगैरे लावुन.... मज्जाच आहे, पुढचा भाग लौकर येऊद्यात
पुणे ते इंदौर.. वॉव .. किती
पुणे ते इंदौर.. वॉव .. किती एक्सायटिंग असेल ट्रिप.. ग्रेट.. होळी च्या वेळेला क्लायमेट पण एकदम कूल
वाह !!!
वॉव!! आधी वाटलं सायकल वरच.
वॉव!!
आधी वाटलं सायकल वरच.
मस्त! पुढच्या भाग ... लवकर
मस्त! पुढच्या भाग ... लवकर येऊ देत....
मस्त सफर.. हा भाग तरी माझ्या
मस्त सफर.. हा भाग तरी माझ्या ओळखीचा म्हणायचा. पुढच्या भागात माझ्यासाठी अनोळखी भाग असतील, म्हणून आतुरतेने वाट बघतोय.
>>>photos nahi
>>>photos nahi disat...
माहिती नाही. बाकी सर्वांना दिसत आहेत.
>>मस्त प्रवास सुरुये....अजून फोटो आणि डिटेल्स पाहिजेत
नक्की!!
>>>>मला वाटलं सायकलने गेलास की काय इंदोरला
>>>>आधी वाटलं सायकल वरच.
>>>मस्त! पुढच्या भाग ... लवकर येऊ देत....
येस्स!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
>>>photos nahi
>>>photos nahi disat...
माहिती नाही. बाकी सर्वांना दिसत आहेत.
>>>>
काही फोटोंची लिंक फेसबुकहून घेतली आहे का? ऑफिसमध्ये फेसबुक बंद असेल तर ते फोटो दिसणार नाहीत. घरून सगळे फोटो दिसत आहेत.
क्लासिक पे क्लासिक! मस्त
क्लासिक पे क्लासिक! मस्त फोटोज!
मस्त भारी आहे प्रवास...
मस्त भारी आहे प्रवास...
मस्त.
मस्त.