इंदूर - भाग ३ - सराफा

Submitted by मनोज. on 29 April, 2015 - 11:39

इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी

इंदूर - भाग २ - रावेरखेडी

>>>"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला....

या पूर्वी एकदा कोणतीही माहिती नसताना आपल्या यकुने दिलेल्या सूचनांनुसार सराफा भेट झाली होती. त्यावेळी सराफा भन्नाट आवडला होता. त्यामुळे दिवसभराचा प्रवासाचा शीण विसरून सराफ्याला जाण्यास सज्ज झालो.
भुषणच्या घरच्यांसोबत थोड्या गप्पा मारून आम्ही सराफ्याकडे कूच केले.

रात्री १०:३० नंतरही सराफा असा फुलला होता..

..

सराफा बाजार हा दिवसा (सोनेचांदीवाल्या) सराफ्यांचा बाजार आहे आणि संध्याकाळी त्यांची दुकाने बंद झाल्यानंतर दुकानांच्या पायर्‍यांवरती खाऊपिवूचे ठेले लागतात

.

आम्ही सुरूवात गराडू पासून केली

.

हे एक वाफवलेले कंदमुळ आहे आणि खाण्याच्या आधी तेलात तळून व त्यावर गराडू मसाला घालून देतात. गराडू मसाला चाट मसाल्यापेक्षा फार वेगळ्या चवीचा परंतु एकदम चटकदार प्रकार होता.

भुट्टे का कीस..

.

गुलाबजाम

.

"मालपुये"

.

मूंग दाल हलवा..

.

"लच्छेवाली रबडी"

.

हा एक स्पेशल जिलबीवाला होता... आपण किती लोक आहोत ते पाहून आणि "कितना खाओगे" असे विचारून सर्वांना पुरेशी होईल या आकाराची एकच जिलबी गरमागरम आपल्या समोर करून देत होता.

.

इंदूरात जावून पानीपतासे कसे चुकवणार...

.

थोडे थोडे हे सगळे (आणि फोटोत न आलेले समोसे, कचोरी आणि "जोशीजी का दहीबडा") हादडून पोट तुडुंब भरले होते. शेवटी आग्रहाची एक कुल्फी आणि फालूदा झाला..

.

या सर्व इंदूरी खासीयत सोबत बाकीही खाद्यपदार्थांचे स्टॉल होतेच..

..

चायनीज, मंचुरीयन, वगैरे वगैरे..

तुडुंब खादाडी करून आणि एक भन्नाट पान खावून रात्री उशीरा घरी परतलो. उद्याचा दिवस संपूर्ण रिकामा होता आणि "आपल्याला दिवसभर कुठे ना कुठे खादाडी करायची आहे!" असे भुषणने बजावून ठेवले होते.

सकाळी उठून आवरले व सर्वांसाठी "पोहा जलेबी" आणण्यासाठी चेतन सोबत पुन्हा मार्केटमध्ये आलो..

.

"भिया आप कुछ खाते नही हो.. चलो आपको और चीजे खिलवाता हूं" असे म्हणून चेतन दोन तीन ठिकाणी घेवून गेला. त्यामुळे उपवासाची कचोरी आणि साबुदाणा खिचडी ही हादडून झाली.

घरी येवून थोडी विश्रांती / गप्पा / कॅरम आणि असे बरेच काही करून एक मस्त झोप काढली.

संध्याकाळी पुन्हा सराफ्याला भेट देवून काल आवडलेले प्रकार आणखी एकदा हादडून झाले व एका प्रसिद्ध ठिकाणाहून भरपूर नमकीन्स खरेदी केले.. चॉकलेट शेव, पाईनॅपल शेव, पुदीना बुंदी असे अनेक अनवट प्रकार मिळाले..

नमकीन्सच्या दुकानात गिर्‍हाईकाच्या बाजुने उघडणारे मोठाले ट्रे होते. हवे ते नमकीन चाखा आणि ऑर्डर द्या.. असा प्रकार.

..

आजही चेतनने आणखी एका प्रसिद्ध ठिकाणी नेवून एक मस्त पान खाऊ घातले. (कोल्हापूरला "राजाबाळ" कडे एक वाळा फ्लेवरचे हैद्राबादी मसाला पान मिळते. त्याच्यासारखी चव होती!)

इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले.

एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता.

(क्रमशः)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Great. I had been to Indore in the १स्त week of April.I also visited sarafa. But could not eat there as I was invited for dinner somewhere. Now I am feelg sad that I missed this food.
Thank u for sharg this.

मस्त. सुंदर. तों पा सु.

सराफा बाजार खुप वेळा टिव्हीवर एका फुड प्रोग्राममधे दाखवलाय तेव्हापासून जायचंय. बघुया कधी योग येतो Happy

फोटो पाहून भूक लागली..इंदूरला किमान ४ दिवस (नाहीतर सगळ्या पदार्थांना न्याय कसा देणार!) राहण्याचा बेत आखला पाहिजे!

होना सर्व चार रात्री सराफा बाजार मधे हादडायला गेलं पाहीजे. माझी मावशी रहाते तिथे तरीपण मी गेले नाहीये अजुन. Sad .

वाह.. सराफा बाजार की यादें ताजा हो गई........

इतक्या वर्षात नमकीन्स मधे भारीच वरायटी आलेली दिसतीये...

कचौडी ला न्याय दिला कि नाही>>>

या सराफ्याला निवांत चार दिस काढुन जाया पायजेन..तेज्यायला..! आदि हवं त्ये नमकिन चर चर चरायचं आनी मदी मदी ते गुलाबजामच्या तळ्यात उडी मारायची...शेवटाला कुटं तरी रस्त्याकडला णिवांत जागा बगून चांगली अर्दा किलो रबडी हानायची त्या बासुंदीरबडी तलावात जाऊण..आनी मांग एकाव येक दोन येकशेवीस तिणशे पाणं लाऊन तरंगत तरंगत घरी जायाचं... भेंडी रोज हाच खेळ...! नंतर वाटलं तर इंदुरहूण पुन्याला चालत यिऊ (बसमधणं! Wink ) पन चार दिस फुल्ल दंगा केल्याबिगार आजाबात माग हटायचं नाय! जूण महिण्यात प्ल्यान करु.. सांगा कोन कोन येनार?

मायला येकदम टाइट झालं पायजे खाऊन खाऊन!

त्ये बासुंदीरबडी आनी गुलाबजामचा(आमच्यासाटी पार्सल ण आन्ता.. ) णिस्ता फोटू हितं टाकणे.. म्हन्जी माणवी जीवणावर अतिक्रमन हाये.

हा भाग आणि फोटो पण छान. बघूनच जीभ खवळली! अबब! काय ते गुलाबजामचे तळे!!
लहानपणी गेले होते इंदूर- उज्जैनला़. शीशमहल पािहल्याचे आठवते. सराफाविषयी काही आठवत नाही आता.

हे माझे फेवरेट

संगमची मून्ग दाल कचोरी,
जोशीचा दहीवडा
अरीहंत / शर्मा चे नमकीन
विजय चे खोप्रा पेटीस
विजय समोर मिळ्णारी पाणीपुरी
चौरसिया चा केशरी पेढा
श्रीक्रुश्ण्ची लस्सी
रानडे , गेलडाची ची स्पेशल कचोरी.
राम बाबूचा पराठा

>>>मनोज तुमचा मित्र इन्दोर ला कुठ्ल्या एरियात राहतो, मि खजराना गणपति मन्दिरा च्या जवळ राहतो.

माहिती नाही.. जेल रोडच्या आसपास (राजवाड्यापासून २ किमी अंतरावर कुठेतरी) राहतो.

कचौडी ला एकदाच न्याय दिला. Wink

प्रतिसादांबद्दल धन्यवाद!!

मी या वीकांताला इन्दौरलाच होतो. आणि ट्रिपमधले तीनही रात्री सराफाला गेलो होतो. वर फोटोत दाखवलेले सगळे पदार्थ ट्राय करून बघितले. इन्दौरला Food Capital of India का म्हणतात ते तिथे गेल्यावरच कळते .............. Happy