त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याची नजर दरीकडे तिघांचा शोध घेऊ लागली , तेवढ्यात त्याला दरीच्या वाटेवर हालचाल दिसली. ते शिल्पा , सुभाष न अमितच होते. तो दरीच्या वाटेवर आला. इकडे तिकडे पाहत तो काहीतरी शोधू लागला.थोड्याच अंतरावर त्याला हातात मावेल असा दगड दिसला,त्याने तो उचलला आणि दरीत उतरू लागला.
थोडा प्रयत्न करून त्या दगडावर चडली . दगडावर चडताच तिने दोन्ही हात पसरून येणाऱ्या वाऱ्याला आपल्या सर्वांगात सामाऊन घेतले, आणि "ह्यलो " असा शब्द मोठ्याने उच्चारला . काही क्षणात त्याचा प्रतिध्वनी तिला एकू आला त्यामुळे ती जास्तच खुश झाली.
शिल्पा बरोबर समीरही बाहेर आला. तो बाहेर येताच सुभाष आणि अमितने थोडीशी कुजबुज केली आणि तेही बाहेर आले. अमित समीरच्या मागे गेला आणि सुभाष दरीच्या वाटेवर जाऊन थांबला.
" शिल्पा मला तुज्याशी बोलायचे आहे". काळजीच्या स्वरात समीर बोलला.
" काय रे समीर , नंतर बोलू ना ." शिल्पा बोलली.
" नाही मला आत्ताच बोलायचे आहे." असे म्हणत समीरने तिला खालीच ओढले.
समीर झोपेतुन अचानक जागा झाला. सकाळचे ८ वाजले होते. रात्रभर तयाला झोप लागली नव्हती .
सुभाश आणी अमितचे बोलणे त्याला सतत आठवत होते,पण आपण एकले ते खरे का खोटे याबदल तो साशंक होता. अचानक त्याची नजर समोरच्या कॅलेंडर वर गेली . " दोन दिवस बाकी" असा तो पुटपुटला.
"कशाला रे दोन दिवस बाकी ?" बेडरूम मध्ये येतच त्याच्या आई ने विचारले .
" अ. ...काही नाही" थोडासा अडखळत तो बोलला आणि बेडवरून उतरून सरळ बाथरूम मध्ये घुसला जेणेकरून आईचे पुढचे प्रश्न टाळता येतील .