त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याची नजर दरीकडे तिघांचा शोध घेऊ लागली , तेवढ्यात त्याला दरीच्या वाटेवर हालचाल दिसली. ते शिल्पा , सुभाष न अमितच होते. तो दरीच्या वाटेवर आला. इकडे तिकडे पाहत तो काहीतरी शोधू लागला.थोड्याच अंतरावर त्याला हातात मावेल असा दगड दिसला,त्याने तो उचलला आणि दरीत उतरू लागला.
निम्म्या वाटेवर आल्यावर त्याला झाडीत संशयास्पद हालचाल दिसली.पाठोपाठ शिल्पाच्या ओरडण्याचा आवाज आला तसा त्याला दरदरून घाम फुटला. त्याचा दरी उतरण्याचा वेग दुप्पट झाला. तो मोकळ्या मैदानात आला.त्याने सभोवताली नजर टाकली. एका झाडीत त्याला काहीतरी दिसले. तो धावतच तिकडे गेला.ती शिल्पाच होती. तिची अवस्था पाहून तो खूप घाबरला. त्याच्या हातातील दगड आपोआप गळून पडला. शिल्पाचा ड्रेस रक्ताने माखला होता. तिला जराही हालता येत नव्हते. सुभाष व अमित आजूबाजूला दिसत नव्हते. यावरून त्याला अंदाज आला कि, आपण त्यांचे अर्धवट ऐकलेले बोलणे खरे होते.
" शिल्पा मी आलोय . घाबरू नकोस! " तिच्या शेजारी गुड्ग्यावर बसत तो म्हणाला.
" समीर मला माफ कर. मी तुज्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला नको पाहिजे होते". कन्हतच आणि अडखळत ती बोलली.
" ते जाऊदे ! नंतर बोलू त्याच्यावर!" समीर बोलला.
एवढी चढण चढून शिल्पाला उचलून वर नेणे शक्य नसल्याने तो मदतीसाठी रस्त्याच्या दिशेने जाऊ लागला. निम्मे अंतर झाल्यावर अमित न सुभाष त्याला अचानक आडवे आले.सुभाषच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता. समीर समजायचे ते समजला . तो मागे फिरला आणि सर्व ताकत एकवटून जीवाच्या आकांताने धाऊ लागला.उतार असल्याने पायाची गती जास्तच वाढली. तो शिल्पा जिथे होती तिथे आला . ते दोघेही मागोमाग आले. समीर ला काही करावे सुचत नव्हते. अचानक त्याला मोठ्याने हसण्याचा आवाज एकू आला.तो शिल्पाच्या बाजूने येत होता .त्याने तिकडे पहिले तर चक्क शिल्पाच हसत होती. हसत हसत ती उठली . तोपर्यंत सुभाष न अमितही त्या हसण्यात सामील झाले. ते तिघे एकमेकांना टाळ्या देऊ लागले.
थोडा विचार केल्यावर समीरच्या डोक्यात प्रकाश पडला . आज १ एप्रिल आणि आपण फुल बनलोय.
त्याच्या चेहऱ्यावरचे टेन्शन गायब झाले.शेजारी पडलेली काठी त्याने उचलली आणि तो तिघांच्या मागे लागला आणि सारा आसमंत चोव्घांच्या आवाजाने व्यापला.
काळजी भाग 3
Submitted by अभिजित चोथे on 25 March, 2015 - 03:08
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदाच पूर्ण कथा पोस्टल्यावर
एकदाच पूर्ण कथा पोस्टल्यावर पुन्हा त्याच कथेचे तीन भाग का केलेत?
अगोदर ३ भाग पोस्ट केले . नंतर
अगोदर ३ भाग पोस्ट केले . नंतर पूर्ण कथा पोस्ट केली पहिलेच लेखन असल्याने लक्षात आले नाही . माय मराठीवर मी नवीन आहे.
" कथा कशी वाटली?"