थोडा प्रयत्न करून त्या दगडावर चडली . दगडावर चडताच तिने दोन्ही हात पसरून येणाऱ्या वाऱ्याला आपल्या सर्वांगात सामाऊन घेतले, आणि "ह्यलो " असा शब्द मोठ्याने उच्चारला . काही क्षणात त्याचा प्रतिध्वनी तिला एकू आला त्यामुळे ती जास्तच खुश झाली.
शिल्पा बरोबर समीरही बाहेर आला. तो बाहेर येताच सुभाष आणि अमितने थोडीशी कुजबुज केली आणि तेही बाहेर आले. अमित समीरच्या मागे गेला आणि सुभाष दरीच्या वाटेवर जाऊन थांबला.
" शिल्पा मला तुज्याशी बोलायचे आहे". काळजीच्या स्वरात समीर बोलला.
" काय रे समीर , नंतर बोलू ना ." शिल्पा बोलली.
" नाही मला आत्ताच बोलायचे आहे." असे म्हणत समीरने तिला खालीच ओढले.
शिल्पा संतापली तिने त्याच्या हाताला झटका दिला अन सुभाषला जाऊन बिलगली. समीरला खूप वाईट वाटले. हे पाहून सुभाष बेरकीपणे हसू लागला.
" दोघा एवजी तिघे मजा करू यार ! चिल!" पाठीमागून येत अमित समीरच्या कानात पुटपुटला.
अमित असे बोलताच त्याला खूप राग आला. त्याचे सर्वांग गरम झाले.
त्याने सुभाष कडे पहिले. तो आणि शिल्पा तिथे नव्हते. त्याचा जीव घाबराघुबरा झाला. मागे पाहिले तर अमितही गायब होता. त्याचे अंग थरथरू लागले. हृदयाची धडधड वाढली.