मनमोहक "इर्शाळ"
Submitted by Yo.Rocks on 11 March, 2015 - 23:28
पावसाचा जोर सरला की सह्याद्रीमध्ये निसर्गाचे रंग अधिक उठून दिसतात.. वातावरण स्वच्छ बनते.. दुरदूरची डोंगररांग नजरेस पडते.. उनामध्ये हिरव्या गवताचा व पिवळ्या सोनकीचा रंग अधिक भडक वाटतो.. फुलपाखरांची उधळण होते... जणू सरत्या पावसाला प्रेमळ निरोप देण्याची तयारी सुरू होते नि ही तयारी कितपत हे पाहण्यासाठी आमचा मग एक छोटासा ट्रेकही होतो.. ! एक दिवसात पाहून येण्यास सोयीचे म्हणून ठरले 'इर्शाळगड' !
विषय: