एक उरलेले कोडे - शिळ्या कढीला ऊत
Submitted by हर्पेन on 28 February, 2015 - 08:12
हे एक मागच्या मभादि निमित्त तयार केलेले कोडे आता देत आहे. म्हणून शिळ्या कढीला ऊत म्ह्टलंय
अनेक उत्तम चित्रकृती साहित्यावर आधारित आहेत / असतात. चित्रपट विषयक लिखाण आवडीने वाचणारे अनेक वाचक मराठीत आहेत. वाचक आहेत तर लिहिणारे देखील आहेत. मराठीत चित्रपट या विषयावर रसरंग, चंदेरी अशा नियतकालीकांद्वारा विपुल लिखाण झाले आहे. पण मराठीतल्या एका वाचकवर्गाची भूक नियतकालीकांमधल्या गावगप्पांपेक्षा अधिक काहीतरी वाचायची आहे. त्यामुळेच असेल पण मराठीत समीक्षा, आस्वादक रसग्रहण, चित्रपट-निर्मिती कथा, स्मरणरंजन अशा अनेक स्वरूपातले लिखाण पुस्तक बद्ध झालेले आढळते.
शब्दखुणा: