क्रोशेकाम
बाहुलीसाठी स्कर्ट-ब्लाऊज -क्रोशेकाम (बदलून )
मी हौस म्हणून क्रोशेकाम करते. शाळेत असतांना आम्हाला शिवणकाम हा विषय होता आणि त्यात आम्हाला शिवणकामासोबत विणकाम देखील शिकवले. लहान मुलांचा स्वेटर आणि मोजे करायची परीक्षा होती. माझी आज्जी खूप हौशी आणि ती सतत काहीतरी विणत असे. मला स्वत:ला विणकाम फारसे रुचले नाही. इथे आल्यावर मुबलक वेळ आणि मुबलक इंटरनेट दोन्ही हाती आले. मग युट्यूब वरची ट्युटोरिअल पाहून क्रोशे करायला शिकले.
मैत्रिणीच्या मुलीची फर्माईश होती माझ्या बाहुलीसाठी स्कर्ट-ब्लाऊज करून दे. म्हणून हा प्रयत्न. :)
४ जुलै निमित्त रेड , व्हाईट अॅन्ड ब्लू
ही शाल मी माझ्या लेकासाठी विणली होती. ९/११ नंतर त्याच्या काही फ्रेंड्सचे आईबाबा अॅक्टिव ड्यूटीवर रवाना झाले. बघता बघता सिमेट्रीत फ्लॅग्जची संख्या वाढू लागली. बावरलेल्या लेकाने लायब्ररीतून आणलेल्या मासिकात्/पुस्तकात ही शाल बघितली आणि हट्ट केला. मी केलेली ही पहिलीच शाल. आज उन्हे दाखवायला बाहेर काढली आणि जुन्या आठवणी गोळा झाल्या.
कहाणी माझ्या क्रोशेकामाची
मायबोलीवर माझ्या क्रोशे कामाचं वेळोवेळी खूप कौतुक झालं आहे . त्याबद्दल सर्व माबोकरांना परत एकदा धन्यवाद. ही आहे माझ्या क्रोशेकामाची कहाणी.
लेकीच्या लग्नानंतरचा पहिला अधिक महिना होता आणि माझी जावयांना वाण द्यायच्या तयारीची लगबग सुरु होती. आता तुम्ही म्हणाल की माझ्या क्रोशेचा अधिक महिन्याच्या वाणाशी काय संबंध? पण आहे..... वाचा तर खरं !!
ताट, निरांजन, अनारसे, लेकीला साडी, दोघांच्या आवडीचा मेन्यु असं सगळं मस्त प्लॅनिंग चाललं होतं.