पाउस Submitted by असुमो on 11 February, 2015 - 05:24 तुझ्या अंगणी रिमझिम झरलेला पाऊस माझ्या दारी फक्त कोसळलेला पाऊस आपुलीच सुखे अन् आपल्याच वेदना हळू-हळू तुला मला कळलेला पाऊस दूर-दूर दोघेजण अन ओढाळलेले मन गढूळलेल्या नजरेने स्मरलेला पाऊस कधी बंध फुटतो उरातल्या उरात क्षणभर तेवढाच होई हळ्वेला पाऊस विषय: काव्यलेखनशब्दखुणा: गझलपाउसरिम्झिम