सागरी किनारा

सागरी किनारा

Submitted by अनंत s on 14 March, 2025 - 05:23

नयन रूपी सागरात तुझ्या मी अथांग बुडालो.
काल होतो माझा आज तुझाच जाहलो...

पडता सोन्याची किरणे उजळला आसमंत सारा.
ओल्या मिठीत तुझ्या आला अंगावरी शहारा..

रेतीत तुझ्या पावलांचे उमटले आज ठसे.
प्रेमात पडली लाट म्हणाली मिटवू मी कसे..

जमले ढग आकाशी आणि सुटला सुसाट वारा.
आपल्या प्रेमाची साक्ष देतो हा रेशमी किनारा...

चल भिजू दे आज आणि होऊ दे ओले चिंब.
नितळ पाण्यात बघूया दोघांचे प्रतिबिंब...

अनंत

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

भेट (गंगोदक वृत्त)

Submitted by संतोष वाटपाडे on 8 January, 2015 - 23:24

वाहणार्‍या नदीचे किनारे जसे हात हातात घेऊन चालायचे
आपले प्रेम तेव्हा मला साजने त्या जलासारखे धुंद वाटायचे...

यायची भेटण्या रोज घाटावरी जायची घेऊनी शब्द ओठातले
स्पर्श झाले जरी राहिलेही जरी दुःख माझ्या मनी मात्र दाटायचे...

सागरी लाट पायात रेंगाळते पावलांना कधी लाजुनी चुंबते
दूर गेल्यावरी ती मला सोडुनी सांग कोठे तिला रोज शोधायचे...

हे धुके रोज येते तुला स्पर्शण्या पांघराया जुनी आठवे घेत जा
मी कुणाला कुणाला बरे साजने लक्ष ठेवूनिया व्यर्थ टोकायचे..

सांज व्याकूळ होते मनासारखी थांबते चालते.. थांबते चालते
रात्र होते कधी एकदा वाटते स्पंदनांना किती काळ रोखायचे...

Subscribe to RSS - सागरी किनारा