उठा पुन्हा सज्ज व्हा

उठा पुन्हा सज्ज व्हा !

Submitted by गणेश पावले on 5 January, 2015 - 23:57

हे काव्य झोपलेल्या हिंदू सुपुत्रांसाठी….
"उठा पुन्हा सज्ज व्हा !"

कसे पांग फेडू तुझे । कशी रक्षु मातृभूमी
कसा लढू फितुरांशी । कशी गाजवु रणभूमी

लाख लढाया लढतो आजही । गनीम कापितो घावासरशी
तळहातावर घेवून प्राण । तुम्हा स्मरतो जीवापाशी

जीवा, शिवा, ताना, बाजी । होते वीर तुम्हा संगती
आज नाही राहिले मर्द । जे स्वराज्यास मानिती प्राणज्योती

माय भगिनी पुन्हा बाटल्या । कापली कसायाने गाय
नाही उरला वाली कोणी । जो सदा खडा रक्षणाय

कर्मभ्रष्ट झाले सगळे । धर्म वाऱ्यावर सोडून
हिंदू बाटतो रात्रंदिन । माय रडे हाय मोकलून

Subscribe to RSS - उठा पुन्हा सज्ज व्हा