तू आणि मी प्लस आठवणी
Submitted by गणेश पावले on 5 January, 2015 - 23:51
जेंव्हा पासून तुला "स्वप्नात" पाहिलं…
(नवल वाटतं ना? स्वप्नात पाहणं. पण हे खर आहे)
तेंव्हापासून जीव जडला तुझ्यावर
ते स्वप्न वेडं होतं, कि मीच वेडा होतो…
नाही माहित, ते प्रेम होतं कि आकर्षण?
पण मन मात्र कशात तरी अखंड बुडालं होतं
प्रेमाच्या झोतात उगाच कुठेतरी भरकटत होतं
बर झालं त्यातून तूच मला सावरलंस
अशक्यातलं गणित तूच तेंव्हा सोडवलंस
कदाचित प्रेमदूत होतीस तू….!!
माझ्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी.
तुझी वाट वेगळी अन माझीही वाट वेगळी
प्रवास होता फक्त स्वप्नातल्या भेटीगाठीच्या आठवणींचा
जीवाला अजिबात कसलाही घोर नव्हता,
कोणतीही अस्वस्थता न्हवती,
विषय: