बिहार

बिहारमधील राजकीय उलथापालथ

Submitted by टवणे सर on 26 July, 2017 - 14:48

बिहारमध्ये जद(यु), राजद आणि काँग्रेस यांचे महागठबंधन नितिश कुमारांच्या राजीनाम्यानंतर तुटलेल आहे. ताज्या बातम्यांनुसार बिहारमध्ये पुन्हा भाजपा आणि जद(यु)चे आघाडी सरकार येईल असे दिसते.
काँग्रेस पक्षासाठी हा अजून एक पराभव आहे. आता त्यांचे राज्य असलेले कर्नाटक, पंजाब आणि हिमाचल वगळता बाकी महत्त्वाचे मोठे राज्य नाही. यामध्येदेखील राज्यसभा, लोकसभा जागांच्या वजनानुसार कर्नाटक महत्त्वाचे, पंजाब/हिमाचल तुलनेने लहान आहेत.
मा. राहुल गांधींनी स्वतः प्रयत्न करून जोडलेल्या महागठबंधनाची हार कुणामुळे झाली हा प्रश्न उभा राहील. लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेतच.

अखेर

Submitted by आतिवास on 17 December, 2014 - 05:49

मी तिला पाहते तेव्हा सकाळचे नऊ वाजले आहेत. अर्थात लाकडाची मोळी डोक्यावर वाहताना तिचा चेहरा खाली झुकला आहे त्यामुळे मला तो दिसत नाही. तिची आणि माझी ओळख नाही आणि मी तिच्याशी बोलत नाही, त्यामुळे ती ओळख होतही नाही. स्वत:च्या कामात मग्न असणा-या त्या अनोळखी स्त्रीचा फोटो काढणं खरं तर योग्य नाही, ते एका अर्थी तिच्या खासगीपणावर आक्रमण आहे याची मला जाणीव आहे. पण तरीही मी हा फोटो काढते. माझ्या सभोवतालच्या अनेक स्त्रिया रोज अशा ओझ्यासह जगतात याची मला आठवण रहावी म्हणून मी हा फोटो काढते आहे.

विषय: 
Subscribe to RSS - बिहार