आलो पुन्हा तुझ्या दारी
मागणं घेऊन..
तुलाही वाटत असेल ना रे, कसा हा असा?
नेहमीच काहीतरी मागणारा?
पण देणारा तूच एक आहेस ना रे..
मग जाऊ तरी कोणाकडे?
अर्ज़ियाँ सारी मैं चेहरे पे लिख के लाया हूँ
तुम से क्या माँगू मैं
तुम ख़ुद ही समझ लो
मौला मेरे मौला
दरारें-दरारें हैं माथे पे मौला
मरम्मत मुक़द्दर की कर दो मौला मेरे मौला
तेरे दर पे झुका हूँ, मिटा हूँ, बना हूँ
मरम्मत मुक़द्दर की कर दो मौला
तू समजून घेतोस म्हणून मला असं वेड पांघरायला आवडतं...
तुला अन मला दोघांनाही माहितीये मी का आलोय पण माहित नाही असं दाखवतोस...
जोखलेलं असतंस आधीच पण मी कधी येतोय याची वाट पहातोस...
बरीच गाणी नुसतीच कानावर पडतात.
ना त्यांचे बोल लक्षात राहतात ना धून.
पण काही गाणी कानातून मनापर्यंत पोहोचतात.
हृद्याला भिडतात... आत्म्याला साद घालणारी काही गाणी असतात.
अशा आवडलेल्या गाण्यांचे आपल्या शब्दात भावानुवाद लिहिण्यासाठी हा धागा 
या भावानुवादांनी गाणी उमजून घ्यायला मदतच होईल.
एखाद्या आवडत्या गाण्याचे नवीन कंगोरे दिसतील, समजतील.
तसा तू स्वार्थीच पहिल्यापासून. हो आणि हे लेबल लावणंही तुला न पटणारं.
कैसी तेरी खुदगर्ज़ी
ना धूप चुने ना छांव
कैसी तेरी खुदगर्ज़ी
किसी ठोर टीके ना पाऊँ
मी आज असा आहे उद्या वेगळा असेन. मनाला वाटेल तसं वागेन, तरलो तरी स्वतःच्या दमावर आणि बुडालो तरी स्वतःच्या दमावर असं म्हणणारा तू.
पण याच एका गोष्टीत काहीच का निवडत नाहीस? ना हे ना ते.
तसा तुझा पाय कधी एका ठिकाणी टिकला नाहीच म्हणा.
मोठी स्वप्नं बघायचास. भरभरून बोलत राहायचास त्यांच्याबद्दल.
जगभर भटकायचं तुझं स्वप्न.
ते पूर्ण करायला जे घराबाहेर पडलास ते पडलासच.
बन गया अपना पैगम्बर
तर लिया तू सात समंदर