निष्ठा

काडी मोड

Submitted by गण्या. on 21 September, 2014 - 01:52

शेजारणीचा नवरा | म्हणावा आपुला | होऊन जाऊ दे | काडीमोड ||

खबर लागता | घट फुटण्याची | काढावे भांडण | नव-याशी ||

नांदले कशी मी | दोन तपे गं | दोन्हीची बेरीज | सांभाळोन ||

आता करून | नवा घरोबा | संसार नव्याने | करायाचा ||

ताई माई अक्का | विचार पक्का | आशिर्वाद तोचि | द्यावा पुन्हा ||

,

गण्या

( या कवितेचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा काही एक संबंध नाही )

Subscribe to RSS - निष्ठा