Submitted by गण्या. on 21 September, 2014 - 01:52
शेजारणीचा नवरा | म्हणावा आपुला | होऊन जाऊ दे | काडीमोड ||
खबर लागता | घट फुटण्याची | काढावे भांडण | नव-याशी ||
नांदले कशी मी | दोन तपे गं | दोन्हीची बेरीज | सांभाळोन ||
आता करून | नवा घरोबा | संसार नव्याने | करायाचा ||
ताई माई अक्का | विचार पक्का | आशिर्वाद तोचि | द्यावा पुन्हा ||
,
गण्या
( या कवितेचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा काही एक संबंध नाही )
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणखी पण एक कविता
आणखी पण एक कविता होती-
शेजीबाईचा कोंबडा, आला माझ्या दारी
घालीन चारा, पाजीन पाणी.
शेजीबाईचा बैल, आला माझ्या दारी
घालीन वैरण, पाजीन पाणी.
शेजीबाईचा नवरा, आला माझ्या दारी
घेईन -- ----
या कवितेचाही महाराष्ट्रातील दलबदलु घोडेबाजारी राजकारणाशी काही संबंध नाही.
दोन्ही कविता . लय भारी .
दोन्ही कविता . लय भारी .